Self Talk : टेन्शन की डिप्रेशन..., मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:शी संवाद कसा साधाल?

Mental Health : झोपेतून उठल्यानंतर आपल्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु होते. त्यामुळे आपल्याला सतत टेन्शन किंवा डिप्रेशन येऊ लागते. अशावेळी स्वत:शी संवाद साधणे जास्त गरजेचे आहे.
Self Talk
Self TalkSaam Tv
Published On

Self Talk Benefits :

झोपेतून उठल्यानंतर आपल्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु होते. त्यामुळे आपल्याला सतत टेन्शन किंवा डिप्रेशन येऊ लागते. अशावेळी स्वत:शी संवाद साधणे जास्त गरजेचे आहे.

स्वत:शी संवाद साधल्यामुळे आपले विचार, भावना आणि कृतींना आकार मिळतो. याचा आपण अधिक गांभीर्याने विचार करत जरी नसलो तरी यामुळे आपल्यात आत्मविश्वास टिकून राहातो. या संवादामुळे आपल्या जीवनावर अधिक चांगले परिणाम होतात. म्हणून सकारात्मक स्व-संवाद म्हणजे स्वत:शी सकारात्मक बोलल्याने जीवनात मोठा बदल घडतो.

तुम्ही ज्या पद्धतीने वागता त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्यासाठी सेल्फ टॉक करणे जास्ती गरजेचे आहे. जाणून घेऊया सेल्फ टॉकचे फायदे (Benefits) काय आहेत.

1. आत्मविश्वास वाढतो

स्वत:शी संवाद साधल्यामुळे माणूस चांगला आणि सकारात्मक राहातो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील वाढतो. अनेक आव्हाने आणि संधीचा सामना करावा लागतो तेव्हा स्वत:ला प्रोत्साहन देता येते.

Self Talk
Weight Loss साठी हेल्दी पर्याय दही-भात, फायदे वाचाल तर थक्क व्हाल

2. तणाव कमी करणे

सकारात्मक संवादामुळे तणाव कमी करता येतो. नकारात्मक विचारांना दूर करता येते. स्वत:शी संवाद साधल्यामुळे भावनिक ताण कमी होऊन मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते.

3. निर्णय कौशल्य सुधारते

स्वत:शी संवाद साधल्यामुळे स्पष्ट विचारांना प्रोत्साहन देता येते आणि निर्णय घेण्याचे कौशल्य सुधारते. जेव्हा व्यक्ती सकारात्मक अंतर्गत संवादामध्ये गुंतत जातो. तेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

Self Talk
Child Care Tips : चिमुकल्यांना खाऊ घाला हे ५ पदार्थ, इम्युनिटी होईल स्ट्राँग; अनेक आजारांपासून राहातील दूर

4. लवचिकता

जर तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी सकारात्मक व्यवहार ठेवा. ज्यामुळे तुम्हाला अपयशातून सावरण्यास, अनुभवामधून शिकण्यास आणि सकारात्मक वृत्तीने प्रतिकूल परिस्थितीकडे पाहाता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com