Weight Loss साठी हेल्दी पर्याय दही-भात, फायदे वाचाल तर थक्क व्हाल

Curd Rice Benefits : तुम्ही देखील वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दही भात खात असाल तर त्याचे इतर अनेक फायदे देखील पाहा. ज्यामुळे तुमचे आरोग्य अधिक निरोगी राहिल.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv
Published On

Weight Loss Tips :

वाढत्या वजनामुळे हल्ली अनेकजण त्रस्त आहेत. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण व्यायाम आणि पुरेसा आहार खातो. परंतु, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्यदायी पर्याय म्हणून खिचडीचे पहिले नाव येते तर काहीजण दही भात खातात.

जर तुम्ही देखील वाढत्या वजनावर नियंत्रण (Weight Loss Tips) ठेवण्यासाठी दही भात खात असाल तर त्याचे इतर अनेक फायदे देखील पाहा. ज्यामुळे तुमचे आरोग्य अधिक निरोगी राहिल. दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात कारण त्यात कॅल्शियम भरपूर असते. दह्यापासून शरीराला प्रोटीन्स मिळतात, कारण त्यात प्रोटीन्सचे प्रमाण चांगले असते. दही पचनक्रिया मजबूत करते त्यामुळे अन्न सहज पचते.

1. बॅक्टेरियाशी लढा

नियमितपणे दही भात (Rice) खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुमचा बचाव होईल. दही भात खाल्ल्याने जीवाणूंशी लढण्यास मदत होते. पचनसंस्था आणि आतड्यासंबंधी आरोग्य निरोगी राहाते.

Weight Loss Tips
Child Care Tips : चिमुकल्यांना खाऊ घाला हे ५ पदार्थ, इम्युनिटी होईल स्ट्राँग; अनेक आजारांपासून राहातील दूर

2. आतड्यांचे आरोग्य

पचनाशी संबंधित समस्या असेल्या लोकांसाठी दही-भात हा चांगला पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक पचन सुधारते. आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया सुधारते. प्रोबायोटिक्स पोटाच्या समस्यांवर मदत करु शकतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

3. हाडे आणि दातांसाठी फायदेशीर

दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप महत्त्वाचे आहे. अशावेळी दही भात खाल्ल्याने तुमची हाडे आणि दात मजबूत होतात.

Weight Loss Tips
हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? Good Cholesterol बद्दल जाणून घ्या काही टीप्स

4. वजन नियंत्रणात राहाण्यास मदत

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दुपारच्या वेळी दही-भाताचे सेवन करा. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स चयापचयावर परिणाम करतात आणि आतड्यांचे आरोग्य (Health) सुधारतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com