Abhishek Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

Abhishek Bachchan - Aishwarya Rai : अभिषेक बच्चनने खोटी अंगठी घालून ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते. त्यावेळी नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिषेक बच्चनचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज होत आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडचे पावर कपल आहे.

अभिषेक बच्चनने खोटी अंगठी घालून ऐश्वर्या रायला प्रपोज केले होते.

अमिताभ बच्चन यांचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारणार आहेत. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. अभिषेक बच्चन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहतो. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडचे पावर कपल आहे.

अभिषेक बच्चनने २००७ मध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केले. हे जोडपे कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. त्याचे प्रेमाचे नाते चित्रपटाच्या सेटवर जुळले. ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेक बच्चनपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. 2011 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने लेक आराध्या बच्चनला जन्म दिला. माय- लेकीचे नाते सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अभिषेकने ऐश्वर्याला एकदम खास अंदाजात प्रपोज केले होते, त्याचा भन्नाट किस्सा जाणून घेऊयात.

अभिषेकने ऐश्वर्याला खोटी अंगठी घालून केले होत प्रपोज

अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, अभिषेकने ऐश्वर्याला २००७ मध्ये एक अंगठी देऊन प्रपोज केले होते, पण ती हिऱ्याची किंवा सोन्याची अंगठी नसून एक नक्कली/खोटी अंगठी होती. त्यावेळी अभिषेक ऐश्वर्यासोबत 'गुरू' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि त्याला अंगठी खरेदी करायला वेळ मिळाला नाही, म्हणून त्याने तिला शूटिंगसाठी वापरली जाणारी बनावट अंगठी दिली. टोरोंटोमध्ये 'गुरू'च्या प्रीमियरनंतर अभिषेकने त्याच्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले.

अभिषेक - ऐश्वर्याचे चित्रपट

  • धाई अक्षर प्रेम के (2000)

  • कुछ ना कहो (2003)

  • धूम 2 (2006)

  • उमराव जान (२००६)

  • गुरू (2007)

  • सरकार राज (2008)

  • रावण (2010)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

Maharashtra News Live Update: पुणे शहरात २० टक्के पाणी कपात; खडकवासला धरणात ८२ टक्के पाणीसाठा

नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Pimpri-Chinchwad : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

October Heatwave: ऑक्टोबरमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या! उष्णतेमुळे होऊ शकतो त्रास, पालकांनो या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT