Abhishek Bachchan On Aishwarya Rai Bachchan Saam TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Tweet: ऐश्वर्याच्या चाहत्याने अभिषेकला दिला 'हा' सल्ला, अभिनेता संतापला, म्हणाला...

ऐश्वर्याच्या चाहत्याने अभिषेकला दिला 'हा' सल्ला, अभिनेता संतापला, म्हणाला...

Satish Kengar

Abhishek Bachchan On Aishwarya Rai Bachchan: बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) 'पोन्नियिन सेल्वन २' या (Ponniyin Selvan 2) चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे. या चित्रपटातील पत्नी ऐश्वर्या राय बच्चनच्या अभिनयाने तो खूपच प्रभावित झाला होता.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि ''पोन्नियिन सेल्वन २' मधील ऐश्वर्याचा अभिनय कसा आहे, हे देखील सांगितले. दरम्यान, एका यूजरने ऐश्वर्याबद्दल असं काही म्हणाला आहे, त्यावर त्याने लगेच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) ट्वीट करून लिहिले की, 'पोन्नियिन सेल्वन २ हा एक उत्तम चित्रपट आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप आनंदी आहे. मणिरत्नम, चियान विक्रम, त्रिशा आणि सर्व कलाकार आणि क्रू यांचे अभिनंदन. ऐश्वर्याचा अभिमान वाटतो, तिने उत्तम काम केले आहे. या ट्विटला उत्तर देताना एका युजरने अभिषेक बच्चनला सांगितले की, त्याने ऐश्वर्याला आणखी चित्रपट साइन करण्याची परवानगी द्यावी. यावर अभिनेत्याने उत्तर देऊन लोकांची मने जिंकली आहेत. (Latest Entertainment News)

युजरने लिहिले की, ''सर, आता तुम्ही ऐश्वर्या रायला आणखी चित्रपट साइन करू द्या आणि तुम्ही आराध्याची काळजी घ्या.'' याला उत्तर देताना अभिषेक बच्चनने लिहिले, ''तिला चित्रपट साइन करू द्या? सर, तिला काहीही करायला माझ्या परवानगीची अजिबात गरज नाही.''

दरम्यान, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांचे २००७ साली लग्न झाले होते. 2011 मध्ये ऐश्वर्याने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव आराध्या बच्चन आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने 'गुरू', 'धूम 2', 'रावण' आणि 'उमराव जान' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governmemt Job: सरकारी नोकरी अन् ८१००० रुपये पगार; BRO मध्ये ४६६ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: मराठा उमेदवार ओळखा, कसब्यात लागले बॅनर

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

SCROLL FOR NEXT