Abhishek Bachchan  Instagram
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan: 'मला नेहमीच तिचं कौतुक...' घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला?

Abhishek Bachchan Reaction: अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चादरम्यान अभिषेकने केलेलं ऐश्वर्याबद्दलचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिषेक बच्चनचा 'आय वाँट टू टॉक' हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटात एका आजारी वडिलांची अन् मुलींच्या नात्याची कथा आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. यानिमित्ताच्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याबद्दलचे वक्तव्य केले आहे ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान अभिषेकने मुलांच्या जीवनातील आई आणि वडिलांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले यावेळी त्याने आई जया बच्चन आणि ऐश्वर्या रायचे कौतुक केले तसेच त्याने वडिल देखील मुलांसाठी तितकेच महत्वाचे असतात असं म्हटलं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चादरम्यान अभिषेकने केलेलं ऐश्वर्याबद्दलचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

अभिषेकचा 'आय वाँट टू टॉक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नाही. मात्र तरीही अभिषेकचा कमाल अभिनय पाहून त्याचे कौतुक होत आहे. चित्रपटाविषयी बोलताना, त्याने आई आणि पत्नीचे कौतुक देखील केले आहे. तो म्हणाला, मी जन्मलो आणि माझ्या आईने अभिनय करण्याचं थांबवलं. याचं कारण की तिला मुलांना वेळ द्यायचा होता. यामुळे वडिल कामामध्ये व्यस्त असायचे यामुळे आम्हाला कधीही वडिल आजूबाजूला नसल्याचे जाणवले नाही.

पुढे त्याने, मी पण याबाबतीत लकी आहे, मी अनेकदा कामानिमित्त बाहेर असतो पण ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत असते यामुळे मला नेहमीच तिचे कौतुक आहे. पालक हे मुलांसाठी नेहमी प्रेरणा देतात. मुलांसाठी पालक नेहमीच अथक प्रयत्न करत असतात. मात्र मी याबाबतीत महिला वर्गाचा नेहमीच सन्मान करत असतो. कारण ते जे काही करतात ते कोणीही करू शकत नाही. वडिल देखील करत असतात. मात्र वडिलांची बाजू कधीही स्पष्ट होत नाही. मात्र एका विशिष्ट वेळेनुसार मुलांना आई आणि वडिल दोघांचेही नाते समजते. अस देखील त्याने म्हटलं आहे. दरम्यान अभिषेकने सांगितल मी लहान असताना वडिल अमिताभ बच्चन यांना एक एक महिना बघायचो नाही. मला नेहमीच शाळेमध्ये मिटिंगला त्यांची कमी जाणवायची ते माझ्या डान्स कार्यक्रमात दिसले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर पगारात होणार भरघोस वाढ; तुम्हाला किती मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: शिंदेसेना-भाजप आमदारांमधील संघर्ष शिगेला, ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या आदेशाला स्थगिती

Sanitary Pads Prolonged Use: दीर्घकाळ सॅनिटरी नॅपकीन वापरल्याने कॅन्सर होतो? पाहा तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT