Milind Gawali : अखेर प्रवास संपला! 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची भावुक पोस्ट, सेटवरील 'ही' गोष्ट घेऊन अनिरुद्ध पडला बाहेर

Aai Kuthe Kay Karte Off Air :लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' चा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे. मालिका संपल्यानंतर अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळींनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Aai Kuthe Kay Karte Off Air
Milind Gawali SAAM TV
Published On

सर्वांची आवडती आणि लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) तब्बल पाच वर्षांनी निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेत आईची भूमिका मधुराणी प्रभुलकर तर वडिलांची भूमिका मिलिंद गवळी (Milind Gawali ) यांनी साकारली. प्रेक्षकांनी देखील या मालिकेला खूप प्रेम केले आहे.

'आई कुठे काय करते' प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट झाल्यावर अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक भावुक पोस्ट केली आहे.

अभिनेता मिलिंद गवळींची पोस्ट

"१९ नोव्हेंबर ला २०२४ "आई कुठे काय करते"चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं, २० तारखेला मतदान, आणि २१ तारखेला "आता होऊ दे धिंगाणा 3" चं "आई कुठे काय करते" च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं, म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूम मध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो, बंगल्याचा सेटिंग चा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं, मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला, हीच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो, गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रक मध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक.

आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर, आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता, अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं, त्यातली माणसं खरी खरी वाटत होती, आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली, एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं, यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपती च्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते, आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करून टाकली जाते, तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकेंचं होत असावं.

खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणार घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो, स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली गेली होती, अक्षरशः कोर्ट रूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसिअस, आश्रम, हॉस्पिटल्स, 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं, फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो, ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी के पी च्या अनुपमाच्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं.

समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणाला नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय."

या पोस्टला चाहत्यांनी आणि कलाकरांनी भरपूर प्रेम दिलं आहे. 'समृद्धी' बंगला या मालिकेचा केंद्रबिंदू होता.त्यामुळे मिलिंद गवळी यांनी घरातून बाहेर पडताना घरातील एक गोष्ट आपल्यासोबत स्वतःच्या घरी आणली आहे.

Aai Kuthe Kay Karte Off Air
Pushpa 2: श्रीलीला अन् अल्लू अर्जुनच्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांना लावलं वेड, 'पुष्पा २' मधील 'Kissik' ची झलक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com