Smita Deo Shared Emotional Post After Seema Deo Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Smita Deo Post: सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट; म्हणाली, “आमच्यातील नातं…”

Smita Deo Shared Emotional Post: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर धाकट्या सुनेने तिच्यातील आणि सीमा देव यांच्यातील नात्यावर भाष्य करत पोस्ट शेअर केली.

Chetan Bodke

Smita Deo Shared Emotional Post After Seema Deo Passed Away

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी सीमा देव यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. सीमा यांच्या पश्चात मुलगा अजिंक्य देव, अभिनय देव आणि दोन सुना, नातवंडं असा परिवार होता. नुकतंच सीमा देव यांच्या निधनानंतर धाकट्या सुनेने सासुबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्य स्मिता देवने तिच्यातील आणि सीमा देव यांच्यातील नात्यावर भाष्य करत पोस्ट शेअर केली.

स्मिता देव आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, “आई-वडील गमावले आहेत, ही गोष्ट स्वीकारणं कायमच आपल्यासाठी कठीण असते. पण माझी सासू माझ्या आईपेक्षा काही कमी नव्हती. ती खरोखर माझी सर्वात जवळची मैत्रीण होती. ज्यावेळी मी अभिनयला डेट करत होते, तेव्हा तिला वाटले की मी “बांद्र्यातील मुलगी” आहे. खूप आधुनिक विचारांनी आहे. आपल्या कुटुंबात कसं जुळवून घेईल? पण माझं आणि अभिचं लग्न झाल्यानंतर, त्यांना माझ्याबद्दल कळल्यानंतर त्यांना सुखःद धक्का बसला. कारण मी त्यांना ते सिद्ध करून दाखवलं. तेव्हापासून ते आतापर्यंत आमच्यात घनिष्ठ मैत्रिणीचं नातं होतं.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये स्मिता देव म्हणते, “आई माझ्याबद्दल कायमच बोलायच्या, मला एक मुलगी होती. पण ती कुठेतरी हरवली होती, जी तू आहेस. त्यांनी माझ्यावर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम केलं आहे. मी आणि आई जेव्हा अभिनयची कामावरून घरी परतण्याची वाट पाहायचो तेव्हा, मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून सासू-सूनेच्या मालिका पाहत पडून राहिलेली असायची. त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला की, माझा सगळाच दिवसभराचा सगळा थकवा निघून जायचा. जिथे मी तिथे सासूबाई, मी आणि आई नेहमीच साडी घेण्यासाठी, भाजीपाला, किराणा माल आणण्यासाठी आम्ही एकत्र जायचो.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये स्मिता देव म्हणाली, “आजही मी दादरला भाजी खरेदी करण्यासाठी जाते, त्यावेळी सर्वच भाजी विक्रेते धावतपळत माझ्या गाडीजवळ येऊन आईंची विचारपूस केल्याशिवाय राहत नाहीत. केळ्याचा घड जर दिला तर त्याचे माझ्याकडून पैसे घेत नाहीत. मला माहितेय की, हे लोकं फक्त त्यांच्यासाठी करत असतात. दुपारी आम्ही दोघीही एकमेकींच्या आवडीचे पदार्थ खायचो. मग झोपण्यापूर्वी त्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी मला सांगायच्या. बालपणीच्या गोष्टी, त्यांनी केलेला संघर्ष, त्या बाबांना (रमेश देव) कशा भेटल्या?, त्यांचं त्यांच्या सासूशी असलेलं सुंदर नातं, असं सर्व काही त्या मला सांगायच्या.”

“आमचे सर्वात धाकटे प्रताप काका आईंना वहिनी नाही तर, आईच म्हणायचे. आईंनी फक्त आपल्या मुलांवरंच प्रेम आणि त्यांचं संरक्षण केलं असं नाही तर, त्यांच्या भाचा- भाची आणि पुतण्यांवरही त्या आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम करायच्या. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी अगदी व्यवस्थित रित्या एकत्र ठेवले होते. जेव्हा अभिनय आणि मी घरातून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्काच होता. माझ्यासाठी एक कठीण आव्हान होतं. पण आम्ही याला सामोरे जाऊ शकलो नाही. आम्ही आईंना आणि बाबांना आमच्याबरोबरच राहायला सांगितलं.”

पोस्टच्या शेवटच्या भागात स्मिता देव म्हणाली, “त्यावेळी त्या दोघांनाही आपआपला कम्फर्ट झोन महत्त्वाचा होता, असं मला वाटायचं. मात्र शेवटी त्यांच्यावर अशी एक वेळ आली, जेव्हा त्या स्वतःला ओळखण्यासाठी धडपड करू लागल्या. त्यांच्यासाठी अभिनय हा त्यांचा दादा होता आणि मी ओळखीची व्यक्ती असल्यामुळे मला चिकटून राहायच्या. स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे, जिथे तुम्हाला डोळे झाकून अनोळखी व्यक्तींच्या खोलीत सोडल्यासारखं वाटतं.”

सध्या अभिनयच्या पत्नीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. कालच अभिनेता अजिंक्य देवने आईच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘ती होती आणि आता ती नाही...’ अशा आशयाची कॅप्शन लिहित अभिनेत्याने व्हिडीओ शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT