
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा इंडस्ट्रीतील एक पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतच त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहे. अशातच मलायकाने अर्जुनच्या कुटुंबियाना सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे.
मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. मलायकाने सोशल मीडियावर अर्जुनच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करण्यास बंद केल्यापासून या चर्चा सुरू झाल्या. एका रिपोर्टनुसार, मलायकाने सोशल मीडियावरुन अर्जुनच्या कुटुंबियाना अनफॉलो केले आहे.
अर्जुन कपूरचे नाव काही दिवसांपासून अभिनेत्री कुशा कपिलसोबत जोडले जात आहे. दिग्दर्शक करण जौहरच्या पार्टीत अर्जुन मलायकासोबत नव्हे तर कुशा कपिलसोबत स्पॉट झाल्याने या चर्चा होत आहेत.
अर्जुन आणि कुशा हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहे. यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे. अभिनेत्रीने या डेटिंगच्या सर्व चर्चांना धूडकावून लावले आहे. ती म्हणाली की, 'मी फक्त प्रार्थना करते की हे माझ्या आईने वाचू नये. नाहीतर तिच्या सोशल लाईफला खूप मोठा धक्का बसेल'.
मलायकाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात तिने तिच्या आयुष्यातील सोबतीबद्दल माहिती दिली आहे. तिने आंतरराष्ट्रीय कुत्रा दिननिमित्त ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, 'माझे शूटिंगचे दिवस घालवण्यासाठी मी यापेक्षा चांगला साथीदार असू शकतो का? माझा सुपरस्टार, कॅस्परसोबत आज आणि दररोज साजरा करत आहे'. तिच्या या पोस्टवर अर्जुनने कमेंट केली आहे.
अर्जुनने या पोस्टवर कमेंट केली आहे. 'तुझ्या आयुष्यातील खरा स्टार कॅस्पर' म्हटलं आहे. तर दुसऱ्या कमेंटमध्ये 'हँडसम मुलगा' असं म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.