Shah Rukh Khan On Salman Look: सलमान - शाहरुखने एकाच वेळी केलाय बाल्ड लूक; नेटकऱ्यांनी थेट किंग खानला विचारलं कारण

Salman Khan Promoting Jawan: सलमानने शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'जवान'च्या प्रमोशनसाठी टक्कल केले आहे?
Shah Rukh Khan - Salman Khan Bold Look
Shah Rukh Khan - Salman Khan Bold LookSaam TV

Shah Rukh Khan Reaction Salman Khan Bold Look:

काही दिवसांपूर्वी सलमान खान त्याच्या नवीन लूकमध्ये स्पॉट झाला होता. सलमानने टक्कल केले आहे. तेरे नाम मधील राधेसारखा आहे.

सलमान खानचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडला असून, अनेक नेटिझन्सनी सलमानच्या नवीन लूकमागे काय कारण असेल याचा अंदाज लावला आहे.

Shah Rukh Khan - Salman Khan Bold Look
Celebrity Reaction On UP Incident: तिला तुरुंगात टाका... विद्यार्थ्याला मारहाण केलेल्या शिक्षिकेच्या विरोध कलाकारांचा संताप

काहींना सरप्राईजिंग उत्तर देत म्हटले की, सलमानने शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'जवान'च्या प्रमोशनसाठी टक्कल केले आहे, या चित्रपटामध्ये शाहरुख खान देखील बॉल्ड लूकमध्ये दिसत आहे.

आज, शाहरुखने ट्विटरवर आस्क एसआरके सत्राचे आयोजन केले होते, त्या दरम्यान त्याने सलमान, जवानाला त्याच्या नवीन लूकसह प्रमोट करत आहे का? असा प्रश्न चाहत्यांनी केला.

Shah Rukh Khan - Salman Khan Bold Look
Dream Girl 2 Collection: आयुष्मान खुरानाला पहिल्यांदाच मिळालं इतकं मोठं यश: 'Dream Girl 2'ची दमदार ओपनिंग

आस्क एसआरके सत्रादरम्यान, एका चाहत्याने शाहरुखला विचारले, "@iamsrk सर सलमान भाई का लेटेस्ट लुक बता रहा है की वो जवान का प्रमोशन कर रहे क्या ये सच है #asksrk." उत्तर देताना, SRK ने लिहिले की, सलमानला माझ्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी कोणताही लूकची गरज नाही.

"सलमान भाई को मुझे प्यार दिखने के लिए कोई लूक नहीं करना पड़ता....वो दिल से ही मुझे हमेशा प्यार करता है...बस कह दिया सो कह दिया!!" असे शाहरुख खानने लिहिले आहे. त्याच्या उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत!

दरम्यान, अलीकडेच शाहरुख खानने जवानच्या एका नवीन पोस्टरचे अनावरण केले, ज्यामध्ये चित्रपटातील त्याचे अनेक लूक्स आहेत.

जवानपासून SRK चे सर्व अवतार एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहायला मिळत आहे, पोस्टरमध्ये चित्रपटातील त्याची पाचही भिन्न रूपे उत्कृष्टपणे प्रदर्शित केली. "ये तो शुरूआत है... ये तीर हैं... अभी ढाल बाकी है... ये अंत है, अभी काल बाकी है. ये पूछता है खुद से कुछ... अभी जवाब बाकी है. प्रत्येक चेहर्‍यामागे एक उद्देश असतो. पण ही तर फक्त सुरुवात आहे..."

एटली दिग्दर्शित, जवान हा शाहरुख खान, विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी यांच्यासोबत एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणचा महत्त्वाचा कॅमिओ आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com