Bigg Boss Grand Finale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Abhijeet-Suraj : बिग बॉसचा ग्रँड फिनाले काही तासांवर येऊन ठेपला आहे. ग्रँड फिनालेला अभिजीत आणि सूरजने जबरदस्त डान्स करून शोची रंगत वाढवली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' चा 5 (Bigg Boss Marathi) सीझन खूप लोकप्रिय ठरला. या सीझनला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद आणि प्रेम मिळाल आहे. कमी दिवसातही या शोनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज (6 ऑक्टोबर ) संध्याकाळी 'बिग बॉस मराठी 5' ग्रँड फिनाले (Bigg Boss Grand Finale) पार पडणार आहे. महाराष्ट्राला 5 वा बिग बॉस मराठीचा विजेता मिळणार आहे.

घरातील सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला एका वेगळ्याचं उंचीवर नेऊन ठेवलं आहे. सदस्यांच्या डान्समुळे ग्रँड फिनालेची शोभा वाढली आहे. ग्रँड फिनालेला अभिजीत (Abhijeet Sawant ) आणि सूरजची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अभिजीत 'तौबा-तौबा' या गाण्यावर डान्स करत आहे तर सूरज (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. या दोघांच्याही डान्सने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा डान्स एनर्जीने भरपूर आहे. 'झापुक झुपूक' ची हुकस्टेप करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. डान्समध्ये दोघांचाही डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

ग्रँड फिनालेला अभिजीत, सूरज , निक्की, जान्हवी, अंकिता आणि धनंजय दादा गेले आहेत. आता या सहा स्पर्धकांपैकी 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

Maharashtra Live News Update : प्रकाश आंबेडकर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

Winter Makeup Tips: हिवाळ्यात लग्नानिमित्त मेकअप करताय? या गोष्टीची घ्या काळजी

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

SCROLL FOR NEXT