Aamir Khan Will Produce Sunny Deol Movie directed by Rajkumar Santoshi Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol - Aamir Khan Movie: 'गदर 2' यशानंतर सनी देओलच्या नवीन चित्रपटाची घोषणा; आमिर खान सांभाळणार 'Lahore 1947'चा भार

Lahore 1947:

Pooja Dange

Aamir Khan Will Produce Sunny Deol Movie:

सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सनी देओल चित्रपटामध्ये काम करणे सुरू ठेवणार असल्याचे म्हटले होते. चाहत्यांना दिलेले हे वचन सनी देओलने पळाले आहे. सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

गेले काही दिवस सनी देओल, दिग्दर्शक राजकुमार संतोषी त्याच्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन करणार असाच देखील बोलले जात होते. आता या वृत्तावर अधिकृत माहिती समोर आली आहे.

अभिनेता आमिर खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आमिर खानने केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला आणि माझ्या संपूर्ण टीमला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमचा आगामी चित्रपट आम्ही सनी देओलसोबत करणार आहोत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'लाहोर १९४७' असे असणार आहे. प्रतिभाशाली अभिनेता सनी देओल आणि माझे आवडते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. आम्ही सुरू करत असलेला हा प्रवास खूप सुंदर असेल असे वचन आम्ही तुम्हाला देतो. आम्हला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.'

सनी देओलच्या आगामी चित्रपटाची कथा १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित आहे. या आशयाचे पंजाबी नाटक असून त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यात येणार आहे. या नाटकाचे नाव 'जिसने लाहोर न देख्या वो जम्याई नहीं' असे आहे.

राजकुमार संतोषी आणि सनी देओल २७ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. या दोघांनाही घायल, घातक, दामिनी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर राजकुमार संतोषी यांनी आमिर खानसोबत 'अंदाज अपना अपना'मध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT