Laal Singh Chaddha Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laal Singh Chaddha Explainer : आमिर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमाला अॅडवान्स बुकिंग मिळाली नाही, कारण...

आमिर खानचा बहुचर्चित असलेला 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

श्रेयस सावंत

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान लाल सिंग चढ्ढा (Laal Singh Chaddha movie) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आमिर खानचा बहुचर्चित असलेला लाल सिंग चढ्ढा सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जगभरात प्रसिद्ध झालेल्या या सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करणार असल्याच्या चर्चा आहेत. पंरतु, आमिरच्या (Aamir Khan) लाल सिंग चढ्ढा सिनेमाला अॅडवान्स बुकिंग (Advance Booking) मिळाली नाही. आमिरचा सिनेमा म्हटलं तर प्रेक्षकांचीही सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. मात्र, सहा वर्षानंतर येणाऱ्या आमिर खानच्या सिनेमाला प्रतिसाद का मिळाला नाही. त्यामागे असणारी कारणे जाणून घेवूयात.

कारण नंबर १ : लाल सिंग चढ्ढा हा १९९४ मध्ये सुपरहिट ठरलेला हॅालिवूड सिनेमा फॉरेस्ट गम या सिनेमाचा रिमेक आहे. त्यावेळी या सिनेमाला सहा ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आमिरने तब्बल सहा ते सात वर्ष या सिनेमाची प्रतिक्षा केली. त्यानंतर आमिरला हक्क मिळाल्यावर सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली.

कारण नंबर २ : लाल सिंग चढ्ढावर बंदी आणण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून हॅशटॅग बॉयकॉट लालसिंग चढ्ढा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यामुळे आमिर खानने देशविरोधी केलेल्या वक्तव्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कारण नंबर ३ : मागील दोन वर्षांपासून कोणत्याही बिग बजेट सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला नाहीय. पंरुतु, दाक्षिणात्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहेत. केजीएफ, आरआरआर आणि पुष्पाला गाजला. पण प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सिनेमांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीय. असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय लाल सिंग चढ्ढा या सिनेमाचं .

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शरद पवार गटाला मोठा धक्का! गडचिरोलीत बाबा आत्रम यांचा विजय

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT