Aamir Khan-Kiran Rao saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?

Kiran Rao Hospitalised : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स वाइफ किरण राववर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने ही बातमी दिली आहे.

Shreya Maskar

आमिर खानची दुसरी बायको रुग्णालयात दाखल होती.

किरण रावची एक शस्त्रक्रिया करण्यात आली

किरण रावने सोशल मीडियावर पोस्ट करून हेल्थ अपडेट दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. आता आमिर खानची दुसरी बायको किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किरण राववर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. तिने यासंबंधित सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

किरण रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तिने तिच्या हॉस्पिटल रूममधून बाहेरचा निसर्ग दाखवला आहे. पहिल्या फोटोत सेल्फी पोस्ट केली आहे. दुसऱ्या फोटोत तिच्या हातातला हॉस्पिटल बँड दिसत आहे. ज्यावर किरण आमिर राव खान असे लिहिले आहे. तिसऱ्या फोटोमध्ये किरण राव हेल्दी खाताना दिसत आहे. तिने या पोस्टला एक कॅप्शन देखील लिहिले आहे. कॅप्शमध्ये तिने हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

किरण रावला शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. ती घरी गेली आहे. तसेच ती नवीन वर्षाचे स्वागत करायला तयार असल्याचे किरण रावने सांगितले. किरण रावने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तिच्यासाठी काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. 2024 मध्ये रिलीज झालेला किरण रावचा 'लापता लेडीज' चित्रपट खूप गाजला.

आमिरचे वैयक्तिक आयुष्य

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी महापौरांना डच्चू? ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचे नाव नाही, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

हनिमूनसाठी श्रीलंकेत, अचानक दोघांचा वाद; आधी बायकोने आयुष्य संपवलं, नंतर नवऱ्याचंही टोकाचं पाऊल

Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Maharashtra Live News Update: बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी स्वीकारला पदभार

Manchurian Recipe: घरी बनवलेले मंच्युरियन नरम पडतात? ही सोपी ट्रिक वापरा, होतील कुरकुरीत

SCROLL FOR NEXT