Aamir Khan VS Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आमिर व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यही दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला, आमिर चुकून रणबीर कपूरला रणवीर सिंग समजतो. त्यामुळे रणबीरला राग येतो आणि दोघेही भांडू लागतात.
या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला आमिर खान एका पार्टीत रोहित शर्माशी बोलत आहे आणि त्यानंतर ऋषभ पंत येतो. आमिरला वाटतं की ऋषभ त्याच्यासोबत सेल्फी काढायला आला आहे, पण तो ऋषभला रणबीरसोबतचा त्याचा फोटो काढण्याची विनंती करतो. आमिर रोहित आणि ऋषभला रणबीरकडे घेऊन जातो आणि म्हणतो, "हा तुमच्या पिढीतील सर्वात मोठा स्टार आहे, रणबीर सिंग." रोहित त्याला सांगतो की हा रणबीर कपूर आहे, तेव्हा तो म्हणतो, " एकसारखीच गोष्ट आहे मित्रा, दोघेही देखणे आहेत."
रणबीर रागावतो आणि तिथून निघून जातो. रणबीर हार्दिक पंड्याला म्हणतो, “तो कपूरला सिंह कसे म्हणू शकतोस? जर मी त्याला सलमान म्हटले तर?" आमिर म्हणतो, "त्याला सलमान म्हणवून घेण्यास काहीच हरकत नाही पण त्याला अरबाज म्हणवून घ्यायला आवडणार नाही." मग अरबाज खान येतो आणि म्हणतो, "मी सोहेलचे बिल फाडले असते."
पुढे हा गोंधळ आणखी रंगत जातो. पण हा सगळं गोंधळ आणि क्रिकेटरला घेऊन केलेली मज्जा ही ड्रिम११ च्या ऍडसाठी. या ऍडसाठी काल आलियाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि या व्हिडीओमध्ये लवकरच अमीर खान आणि रणबीर कपूर आमने सामने येण्याची घोषणा केली होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.