Jannat and Faisu: ब्रेकअप की पब्लिसिटी स्टंट? जन्नत आणि मिस्टर फैजूच्या नात्यात दुरावा

Jannat and Faisu Breakup: टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिस्टर फैजू यांच्या जोडीचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. पण फैजू आणि जन्नतचे ब्रेकअप झाले असल्याचे समजत आहे.
jannat and faisu Breakup
jannat and faisu BreakupSaam Tv
Published On

Jannat and Faisu Breakup: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जन्नत झुबेर जिचे इंस्टाग्रामवर शाहरुख खानपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत, आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजल खान म्हणजेच मिस्टर फैजू हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. जरी दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे कोणतेही नाव दिले नव्हते. पण दोघेही अनेकदा एकत्र दिसले. कलर्स टीव्हीवरील 'लाफ्टर शेफ' या कुकिंग रिअॅलिटी शोच्या पत्रकार परिषदेत जन्नतने फैजूला तिचा भाऊ म्हणून स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण आता या लोकांच्या आवडत्या कपलचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलले जात आहे.

जन्नत जुबैर आणि फैजू दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. प्रथम जन्नतने फैजूला अनफॉलो केले आणि नंतर फैजूनेही जन्नतला अनफॉलो केले. दोघांच्याही या कृतीनंतर त्यांचे चाहते असा अंदाज लावत आहेत की फैजू आणि जन्नत यांचे ब्रेकअप झाले आहे.

jannat and faisu Breakup
Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कोणाला करतोय डेट? आईनेच केला मोठा खुलासा

फैजूला अनफॉलो केल्यानंतर, जन्नतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की आपण जे आहे ते स्वीकारले पाहिजे, जे घडले आहे ते सोडून दिले पाहिजे आणि पुढे जे होईल त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना या कपलचे ब्रेकअप झाले असल्याचे वाटत आहे.

jannat and faisu Breakup
Vicky Kaushal: 'मी त्या योद्ध्याला वंदन...' ; विकी कौशलने भावनिक पोस्ट करून संभाजी महाराजांना वाहिली आदरांजली

चाहते नाराज आहेत

जन्नतच्या या पोस्टखाली चाहते तिला फैजूसोबतच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. काही सोशल मीडिया युजर्स जन्नत आणि फैजू यांना एकमेकांशी बोलण्याचा सल्ला देत आहेत. संभाषणामुळे त्यांची समस्या सुटेल. तर काही चाहते याला फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. त्यांना असे वाटतं की कदाचित दोघांनीही काही ब्रँड किंवा प्रमोशनमुळे एकमेकांना अनफॉलो केलं असेल. अलीकडेच, सेलिब्रिटी मास्टरशेफ होस्ट फराह खानने फैजूला गमतीने सांगितले की ती या वर्षी त्याचे लग्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com