Who Is Khushboo Tawde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: ‘तारक मेहता...’ मधील प्रसिद्ध अभिनेत्रीची मराठी मालिकेत एन्ट्री; साकारणार ‘हे’ पात्र...

Who Is Khushboo Tawde: नवा ट्विस्ट तयार करण्यासाठी लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte New Entry: टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून जबरदस्त चर्चा होत आहे. दिवसेंदिवस कथानक पुढे जाणाऱ्या या मालिकेत लवकरच एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना दिसणार आहे. नवा ट्विस्ट तयार करण्यासाठी लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. लवकरच मालिकेत आशुतोष केळकरच्या बहिणीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. तिच्या एन्ट्रीने मालिकेला काय आणखी नवं वळण मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आशुतोषची बहिण वीणा त्याच्या आयुष्यात परत येणार आहे, आता बहिण म्हटल्यावर थोडे वाद-विवाद येणारच. आशुतोषची बहिण मालिकेत अनिरुद्धची बिझनेस पार्टनर म्हणून देखील दिसणार आहे. वीणाच्या एन्ट्रीने मालिकेचा सर्वच ट्रॅक बदलणार आहे. वीणाची एन्ट्री मालिकेत अनिरुद्धची पार्टनर म्हणून होत असल्याने नक्कीच अरुंधती आणि आशुतोषच्या खासगी आयुष्यात काही वादळ निर्माण होणार का पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest Entertainment News)

अनेकदा वीणाच्या एन्ट्रीची चर्चा मालिकेत झाली होती. चाहतेदेखील तिला पाहण्यासाठी उत्सुक असून अखेर वीणा सगळ्यांसमोर आली आहे. मालिकेत वीणा लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून मालिकेत एंट्री करत आहे.

मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे वीणा नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री गेली अनेक वर्ष मराठी मालिका विश्वात कार्यरत आहे. टेलिव्हिजनसृष्टीतील अभिनयाने खुशबू तावडे हिने सर्वांचीच मनं जिंकली.

खुशबूने ‘आम्ही दोघी’या मालिकेत मीराची भूमिकेत, सोबतच ‘तेरे बिन’या हिंदी मालिकेत नंदिनीच्या भूमिकेत दिसली होती. सोबतच खुशबूने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या मालिकेत बुलबुलची भूमिका देखील साकारली होती. तर सध्या ‘मेरे साई’या मालिकेत सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तर त्यानंतर ‘आई कुठे काय करते’या स्टार प्रवाहवरील मालिकेत आशुतोषच्या बहिणीचे पात्र साकारताना दिसणार आहे.

खुशबू तावडेच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, ‘देवयानी’फेम अभिनेता संग्राम समेळ आणि खुशबू पती पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे. सोबतच, झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि खुशबू या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. सध्या मालिकेत खुशबू नेमक्या कोणत्या रूपात दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT