Aai Kuthe Kay Karte Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: बेजबाबदारपणा..! आता इशाने हरवली अनिशची अंगठी, अरुंधती घेणार टोकाचा निर्णय मालिकेत, काय होणार पुढे?

Marathi Serial Updates: इशा व्हिडीओ कॉलवर घरातील सर्व हकिकत अनिशला सांगायला जाते, त्यावेळी तिला तिची अंगठी सापडत नाही. त्यावेळी तिला नेमकी अंगठी कुठे गेली असा प्रश्न पडतो.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Latest Update: स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिवसेंदिवस अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत लवकरच ईशा आणि अनिशाचा साखरपुडा पार पडणार असून सध्या यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. दोन्ही ही घरात आनंदाचं आणि तणावाचंही वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे. इशा आणि अनिशचं लग्न ठरल्यापासून तिने आधीच घरच्यांसमोर अगदी धुमधडाक्यात साखरपुडा करायचा असं म्हणत तिने तगादा लावला होता.

घरातील वडिलधाऱ्या माणसांनी समजवल्यानंतर ती छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी राजी झाली. पण त्यात सुद्धा इशाला महागड्या वस्तू हव्या होत्या. अनिशच्या आई- वडिलांनी इशाला महागडे कपडे आणि दागिने दिल्यामुळे आता आपणही त्याला महागडे दागिने देऊया असा तिचा हट्ट होता. महत्वाची गोष्ट म्हणजे, अनिशच्या घरातल्यांनी इशासाठी महागातला घागरा घेतल्यामुळे आता अनिशसाठीही आपणं महागातला कुर्ता घ्यावा असं तिचं म्हणणं आहे. (Latest Entertainment News)

इशाचा दिवसेंदिवस वाढलेले हट्ट पाहता, अरूंधतीने तिला सर्व गोष्टींसाठी विरोध केला आहे. आपण आपल्या ऐपती प्रमाणेच कार्यक्रम करावा. साखरपुड्यासाठी अरूंधतीने अनिशसाठी आणलेला कुर्ता इशाला न आवडल्याने तिने घरात बराच वाद घातला होता. (Marathi Film)

इशा व्हिडीओ कॉलवर घरातील सर्व हकिकत अनिशला सांगायला जाते, त्यावेळी तिला तिची अंगठी सापडत नाही. त्यावेळी तिला नेमकी अंगठी कुठे गेली असा प्रश्न पडतो. त्यावेळी ती घरातल्या सर्वांनाच अंगठीबद्दल विचारू लागली. नंतर ती कांचनताईला अंगठी घेतली का विचारायला गेली.

पण त्यात सुद्धा ती कांचनसोबत रागाच्या भरात बोलताना दिसणार आहे. लगेचच कांचनताई तिला आम्ही तुमच्या अंगठीला हात लावलेला नाही, असं म्हणत आपली बाजुस्पष्ट केली.

अनिरूद्धला आपली मुलगी चिंतेत असल्याचं पाहावलं नाही, लगेचच तो इशाला आपण नवी अंगठी घेऊ असं म्हणतो. तेवढ्यात तिथे अरूंधती देखील येते. आता नवी अंगठी या घरात येणार नाही. ती अंगठी जर हरवली असेल तर ती शोधा नाहीतर अनिशच्या बोटातली अंगठीच त्याला पुन्हा घालण्यात येईल असं म्हणाली. हे ऐकून इशाच्या चिंतेत कमालीची भर पडलेली दिसली. आता पुढे नेमकं काय घडणार, इशा अंगठी शोधू शकेल का, या साखपुड्यात आणखी किती विघ्न येणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

SCROLL FOR NEXT