Adipurush Trailer Released: जय श्रीरामचा नारा दाही दिशांना दुमदुमला..! बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Adipurush Trailer Out: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.
adipurush trailer Released
adipurush trailer ReleasedInstagram @actorprabhas
Published On

Prabhas-Kriti Sanon Movie Adipurush Trailer: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. मुंबईमध्ये चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँच मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते. तर काल हैद्राबाद येथे आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले.

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मंगल भवन अमंगल हारी या गीताने होते. हे गीत सुरु असताना एक आवाज येतो. तो आवाज हनुमानाचा आहे तो रामाची कथा सांगत आहे. जंगल आणि तिथे तपस्या करत बसलेल्या हनुमानच्या दृश्याने ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर दुरून राम, लक्ष्मण आणि सीता दिसतात. त्यानंतर हनुमानाची आणि रामाची भेट होते.

या भेटीनंतर प्रभासचे काही सीन्स दाखविण्यात आले आहेत. या सीन्समध्ये प्रभास धनुष्यबाण हातात घेऊन त्याची शक्ती दाखवत आहेत. (Latest Entertainment News)

adipurush trailer Released
Adipurush Trailer Leaked: जय श्री राम! प्रदर्शनापूर्वीच 'आदिपुरुष'च्या ट्रेलरची चर्चा

ट्रेलरच्या ०.३६ सेकंदाला जंगलात हरीण दिसते आणि आवाज येतो, 'भिक्षाम दे'. येथे सैफ अली खान ट्रेलरमधील पहिला लूक दिसतो. ट्रेलरमध्ये राम-सीता यांचे काही रोमँटिक सीन दाखविण्यात आले आहेत. शबरीने रामाला दिलेली बोर आणि लंकेवर आक्रमण, लंकेतील सीता, वानरसेना, हुमानाने लंकेत मांडलेला उच्छाद अशा रामायणातील महत्त्वाच्या घटना ट्रेलरमध्ये दाखविल्या आहेत.

ट्रेलरच्या शेवटी शिवलिंगापुढे तपस्या करत असलेला रावण दाखविण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये रावणाचे फक्त डोळे दाखविण्यात आले आहेत. तसेच रावण पाठमोरा उभा असलेला दाखविण्यात आला आहे. रावणाचे भारदस्त शरीर त्याचे ताकद दर्शवत आहे.

ट्रेलरमधील संवाद देखील दमदार आहेत. चित्रपटातील व्हीएफएक्स देखील कमाल आहेत. पण काही ठिकाणी व्हीएफएक्सचा अति वापर झाल्याचे दखल जाणवत आहेत.

आदिपुरुष चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास-क्रिती व्यतिरिक्त देवदत्त नागे आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

आदिपुरुष चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी ट्रेलर लीक झाला होता. मात्र लगेचच कारवाई हे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटविण्यात आले होते. ट्रेलरमधील काही सीन रेकॉर्ड करून त्याच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या.

आदिपुरुषच्या ट्रेलरमधील लीक झालेल्या व्हिडिओ क्लिप या चित्रपटाच्या ट्रेलरमधीलच असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com