A Valentine Day Film Motion Poster Released Times Square Saam Tv
मनोरंजन बातम्या

A Valentine Day Film : अभिमानास्पद…. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’चा मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकला, Video Viral

A Valentine Day Film Motion Poster Released Times Square : जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या टाईम्स स्क्वेअरवर मराठमोळा चित्रपट ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’चे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटांची चर्चा फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये होते. जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या टाईम्स स्क्वेअरवर मराठमोळा चित्रपट ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’चे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्याने चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

आजवर आपण टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर अनेक बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपट रिलीज झालेले पाहिले असतील. पण पहिल्यांदाच टाईम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज झालेला आहे. सध्या ह्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाची निर्मिती फैरोज माजगांवकर करीत आहे. फैरोज माजगांवर या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहितराव नरसिंगे करीत आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.

चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे यांनी चित्रपटाबद्दल सांगितले, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झाल आहे. ही गोष्ट माझ्यासाठीच नाहीतर अवघ्या फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर माझ्या चित्रपटाचं मोशन पोस्टर झळकलं, त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल. आणि लोकांच्या पसंतीस पडेल.”

हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT