AR Rahman’s Son A.R. Ameen Injured In Chennai Road Accident AI
मनोरंजन बातम्या

Accident News : ए.आर. रहमानच्या मुलाचा रात्री ३ वाजता भीषण अपघात, भरधाव पोर्शे कारने दिली धडक

AR Rahman’s Son A.R. Ameen Accident Update News : ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक-संगीत निर्माता ए.आर. अमीनचा चेन्नईतील गिंडी परिसरात रोड एक्सिडेंट झाला. किरकोळ दुखापतीनंतर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

Alisha Khedekar

  • ए.आर. रहमानचा मुलगा ए.आर. अमीनचा भीषण अपघात

  • चेन्नईच्या गिंडी परिसरात रोड अपघात

  • अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत

  • उपचारानंतर ए.आर. अमीनला डिस्चार्ज देण्यात आला

AR Rahman’s Son A.R. Ameen Injured In Chennai Road Accident मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये रोड एक्सिडेंट झाला. सुदैवाने या अपघातात अमीनला केवळ किरकोळ दुखापत झाली असून, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अमीन आपल्या पोर्श कारमधून जात होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. यावेळी रॅपिडोची वॅगन-आर कार साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येत असताना तिची अमीनच्या कारला धडक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, वॅगन-आर मुख्य रस्त्यावर येत असताना हा अपघात घडला.

या घटनेत अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही तातडीने कावेरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर अमीनला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसरीकडे, वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

याआधीही घडली होती दुर्घटना

अमीनसोबत याआधीही एक मोठी दुर्घटना घडली होती. २०२३ मध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान क्रेनला लावलेला जड झुंबर आणि ट्रस अचानक त्याच्यावर कोसळला होता. सुदैवाने त्यावेळीही तो थोडक्यात बचावला. अमीन हा संगीत क्षेत्रात प्लेबॅक सिंगर आणि म्युझिक प्रोड्यूसर असून, ‘दिल बेचारा’ आणि ‘2.0’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT