Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही वेडे आहेत. त्यांना भेटणायसाठी भारतातंतून अनेक चाहते मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी चाहते येत असतात. आज देखील आगामी नवर्षाच्या शुभेच्या देण्यासाठी अमिताभ बच्चन त्यांच्या जुहूच्या जलसा घराबाहेर आले होते यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली. यामुळे जुहू परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर येतात. त्याप्रमाणे आज २९ डिसेंबर रोजी देखील ते चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बाहेर आले होते. ‘बिग बी’ बाहेर येताच चाहत्यांनी मोठ्याने त्याच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली. तसेच यावेळी त्यांच्या सोबत नातू आगस्त्य नंदा देखील यावेळी उपस्थित होता.
यावेळी त्यांनी चाहत्यांना आगामी नववर्षाच्या शुभेच्या दिल्या तसेच त्यांना भेटण्यासाठी आल्याबद्दल हात जोडून आभार मानले. परंतु त्यांना भेटीला आलेल्या चाहत्यांमुळे त्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. रविवार असल्यामुळे मोठा संख्याने पर्यटक जुहू चौपाटीला फिरण्यासाठी येत असताना त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केले जात आहे.
अमिताभ बच्चन हे ८२ वर्षांचे असून अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी शेवटचे कल्कि 2898 एडी या चित्रपटात अश्वत्थामा ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी चाहत्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. तर सध्या ते कौन बनेगा करोडपती १६ हॉस्ट करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.