
Hansal Mehta VS Anupam Kher : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जीवनावर आधारित 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटाबाबत अनुपम खेर आणि चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्यात वाद झाला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पत्रकार वीर संघवी यांनी अनुपम खेर स्टारर 2019 चित्रपट 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'वर टीका केली. हंसल मेहता यांनी त्याच्याशी सहमती दर्शवली, मात्र अनुपम खेर यांना याचा राग आला. हंसल स्वतः या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. आता हंसल मेहता यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्याकडून चूक झाल्याचे मान्य केले.
हंसल मेहता यांनी या संपूर्ण परिस्थितीवर आपली अंतिम भूमिका मांडत हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. त्याने त्यांच्या X हँडल वर मुलाखतीची लिंक शेअर केली. या मुलाखतीत त्यांनी अनुपम खेर यांच्याशी झालेल्या भांडणावर चर्चा केली. त्याचे कॅप्शन लिहिले आहे, "या ट्रोल फेस्टवर माझे अंतिम विचार"
हंसल मेहता यांनी मुलाखतीत सांगितले की, ते त्यांच्या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी घेतात आत्मपरीक्षण करून माझ्याकडून चूक झाली आहे की नाही हे पाहणे हा माझा विशेषाधिकार आहे आणि त्यानुसार मी माफी मागतो.
हंसल मेहता पुढे म्हणाले, “तुमच्या करिअरमध्ये अशी वेळ येते जेव्हा तुम्ही तुमच्या व्यावसायिक कर्तव्यांचे पालन करता. जरी तुम्ही सहमत नसाल तरी तुम्हाला नेमून दिलेले काम करावे लागते. मला आशा आहे की भविष्यात मी अशा चुका करणार नाही.
हंसल मेहता VS अनुपम खेर
हंसल मेहता पुढे म्हणाले की, भारताचे माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने त्यांना अत्यंत दुःख झालं आहे. मी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा आदर करतो वीर संघवी यांच्या 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'च्या टीकेने अनुपम खेर यांना वाईट वाटल्यामुळे त्यांना वाईट वाटले आहे त्यांच्या भावनांचा देखील मी आदर करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.