Rakhi Sawant Vs Sherlyn Chopra Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood News: सोशल मीडियावरचा वाद थेट पोलिस ठाण्यात; शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरुन राखी सावंतवर गुन्हा दाखल

Rakhi Sawant Vs Sherlyn Chopra: राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यातला वाद हा सोशल मीडियावरुन आता थेट पोलिस ठाण्यात गेला आहे.

सूरज सावंत

Rakhi Sawant Vs Sherlyn Chopra: गेल्या अनेक दिवासांपासून राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात कॅटवॉर सुरू आहे. दोघींनीही एकमेकींवर गंभीर आरोप केले आहेत. हा वाद सोशल मीडियावरुन आता थेट पोलिस ठाण्यात गेला आहे. दोघींनीही एकमेकींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शर्लिन चोप्रा हिच्या तक्रारीवरुन राखी सावंतवर अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (FIR Against Rakhi Sawant)

मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष माध्यमांसमोर शर्लिन हिची बदनामी केली. तिच्या विरोधात अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप शर्लिन चोप्राने केला आहे.

शर्लिनने (Sherlyn Chopra) दिलेल्या तक्रारीनुसार राखी सावंतवर अंबोली पोलिस ठाण्यात 354 अ, 500,504, 509, भादंवि सह कलम 67(अ) माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे राखी सावंतने शर्लिन चोप्राविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. राखीने केलेल्या तक्रारीत शर्लिन चोप्राने सोशल मीडिया आणि माध्ययांशी बोलताना राखी विरोधात अश्लील टिपण्णी केली असून तिच्याच विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

राखीने दिलेल्या तक्रारीनुसार शर्लिन चोप्रावर ओशिवरा पोलिस ठाण्यात कलम 500, 504, 506, 509 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

यावरून सुरू झाला वाद

शर्लिन चोप्रा आणि राखी यांच्यातील वाद तेव्हा सुरू झाला होता, जेव्हा शर्लिनने बिग बॉसमध्ये MeToo आरोपी साजिद खानच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. शर्लिन म्हणाली होती की, 'बिग बॉसच्या घरात अशा लोकांना प्रवेश देऊ नये, ज्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केले आहे'. साजिद खानला सपोर्ट करताना राखी सावंतने शर्लिनला सुनावले. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यांच्यातला वाद आणखी वाढत गेला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

SCROLL FOR NEXT