Horror Movie google
मनोरंजन बातम्या

Horror Movie : 86 मिनिटांचा हॉरर सिनेमा, 6 लाखाचं बजेट, 800 कोटी कमावले; OTT वर धुमाकूळ

Low Budget High Returns : तुम्हाला जर वीकेंडला ओटीटीवर कुठला सिनेमा बघावा असं वाटत असेल तर 2007 वर्षाची ही हॉरर फिल्म बघू शकता. कमी बजेटमध्ये बनवलेल्या या फिल्मने बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.

Parag Kharat

2007 या साली एक हॉरर फिल्म आली होती. ही फिल्म 6 लाखांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली होती. पुढे हाहा म्हणता म्हणता या फिल्मने जगभरातल्या बॉक्सऑफिसवर तब्बल 800 करोड रुपये कमवलेत. एवढी मोठी कमाई बघून चित्रपट निर्मात्ये चक्रावून गेलेत. या फिल्मची कमाई बघून त्यांनी 2021 वर्षांपर्यत याचे 6 सिक्वल बनवलेत. चला तर मग आम्ही तुम्हांला सांगतो हा सिनेमा कुठला आहे.

सिनेमाचं नाव

हा सिनेमा अवघ्या 86 मिनिटांचा आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेजॉन प्राइम व्हिडिओवर जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं नाव आहे " पैरानॉर्मल एक्टिविटी" हे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता ओरेन पेली आहेत. ओरेन यांनीच या सिनेमाची कथा लिहिली आहे. हॉरर श्रेणीत असलेली ही फिल्म जगभरात सर्वात जास्त बघितली जाणारी फिल्म ठरली आहे.

सिनेमाचे कोण-कोणते सिक्वल आहेत.

"पैरानॉर्मल एक्टिविटी" च्या यशानंतर निर्मात्यांनी सिनेमाचा आणखी एक भाग बनवण्याचं ठरवलं. निर्माता ओरेन पेली यांनी " पैरानॉर्मल एक्टिविटी" चे 6 बनवून प्रक्षकांसमोर आणले आहेत. " पैरानॉर्मल एक्टिविटी " चा पहिला भाग वर्ष 2010, दुसरा भाग 2011, तिसरा भाग 2012 मध्ये आणि चौथा भाग 2014, तर पाचवा भाग 2015, तसंच सहावा भाग 2021 मध्ये आला होता.

बॉक्स ऑफिसवरचं सिनेमाचं कलेक्शन

2007 या साली आलेला " पैरानॉर्मल एक्टिविटी" टीमने 7 सिनेमे जगभरातल्या ऑक्सऑफिसमधून एकून 890 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 7320 करोड रुपयांची कमाई केली आहेत. असे सिनेमे भारतात जास्त प्रमाणात तयार केले जात नाहीत. शिवाय आता बरेच लोक ओटीटीवर सिनेमे पाहणे पसंत करतात. याने त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचतो आणि त्या वेळात त्यांना अधिक सिनेमे पाहायला मिळतात.

फिल्मला रेटींग

" पैरानॉर्मल एक्टिविटी" या सिनेमात 4 कलाकार आहेत. या सिनेमाचं जर रेटींग ओटीटी प्लॅटफार्मवर पाहिलं तर 10 पैकी 7 रेटींग मिळालं आहे. म्हणजेच लोक मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहणे पसंत करतात. त्यामुळे असे सिनेमे पुन्हा तयार केले जातात. बऱ्याच लोकांना मनोरंजनात्मक सिनेमे आवडतात. मात्र त्यात हॉरर सिनेमे पाहणारा वर्गही सगळ्यात जास्त आहे.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT