Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

homemade snacks recipe: कामाच्या घाईगडबडीत आपल्याला काही स्पेशल किंवा आवडीचे पदार्थ घरी तयार करता येत नाहीत.
homemade  snacks recipe
homemade snacks recipesaam tv
Published On

कामाच्या घाईगडबडीत आपल्याला काही स्पेशल किंवा आवडीच्या टेस्टी डीश घरी तयार करता येत नाहीत. अशा वेळेस आपण बाहेरचे पदार्थ खाणे पसंत करतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसू लागतो.

अशा परिस्थितीत आपण काय बनवायचं? हा प्रश्न आपल्याला सतत पडू शकतो. त्यात स्नॅक्ससाठी नेहमीचे ठरलेले पदार्थ खावून आपण कंटाळतो. या समस्येचा विचार करुन आम्ही काही स्पेशल डीश तुमच्यासाठी आणल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत.

झटपट रेसिपी पुढील प्रमाणे आहेत:

सत्तू चॉकलेट बार

साहित्य

२ कप सत्तू

1/4 कप गूळ पावडर

50 ग्रॅम गडद चॉकलेट

1/2 बटर

2 टेस्पून ड्राय फ्रूट्स

कृती

सर्वप्रथम, डार्क चॉकलेट, गूळ पावडर आणि बटर चांगले मिसळा आणि ते गुळगुळीत करा. यानंतर सत्तू आणि ड्रायफ्रुट्स घालून मऊ पीठ मळून घ्या. आता त्यांना चॉकलेट मोल्डमध्ये आकार द्या आणि एका तासासाठी बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. तयार झाले तुमचा सत्तू चॉकलेट बार.

homemade  snacks recipe
Winter Health Care: गुलाबी थंडी आरोग्यासाठी ठरू शकते धोक्याची; हिवाळ्यात कशी घ्याल काळजी

कॉर्न भेळ

साहित्य

१ वाटी उकडलेले कॉर्न

1/4 वाटी शेव

1 बारीक चिरलेला कांदा

1-2 चमचे चिरलेली कोथिंबीर

१ टेबलस्पून चिरलेली हिरवी मिरची

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

1/2 टीस्पून लाल तिखट

1 टेबलस्पून लिंबाचा रस

1 टीस्पून चाट मसाला

१/२ टीस्पून जिरे पावडर

चवीनुसार मीठ

कृती

एका मोठ्या भांड्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सर्व मसाले कॉर्नसह चांगले मिसळा. नंतर वरून मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यावर शेव मिक्स करा. कॉर्न भेळ तयार होईल.

बटाटा वडा

साहित्य

2 कप बेसन

१/४ कप तांदळाचे पीठ

20 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे

1 टीस्पून तेल

१/२ टीस्पून जिरे

१/२ टीस्पून आले-लसूण पेस्ट

1/2 टीस्पून सेलेरी

1/4 टीस्पून हळद पावडर

1 टीस्पून मिरची पावडर

1 टीस्पून लाल मिरची

5 उकडलेले मॅश बटाटे

2 चमचे लिंबाचा रस

2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

10 कढीपत्ता

चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता तळून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट, लाल मिरच्या चांगल्या परतून घेतल्यावर मॅश बटाटे आणि मीठ अ‍ॅड करा . पुढे शेंगदाणे , लिंबाचा रस अ‍ॅड करा. पुढे तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा तुमचे मिश्रण तयार आहे. 

आता एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ आणि सेलेरी सोबत मीठ, हळद, तिखट घालून मिक्स करा. पिठात आवश्यकतेनुसार पाणी घाला. बेसनात आधी तयार केलेले बटाट्याचे मिश्रण टाका, त्यावर कोट करून तळून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सर्वात कमी वेळात झटपट रेसिपी तयार करु शकतात.

Writtern By: Sakshi Jadhav

homemade  snacks recipe
Places To Visit Near Manali: निसर्गाच्या सानिध्यात सेलिब्रेट करा वाढदिवस; पाहा मनालीच्या आसपास लपलेली सुंदर पर्यटन स्थळे

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com