Places To Visit Near Manali: निसर्गाच्या सानिध्यात सेलिब्रेट करा वाढदिवस; पाहा मनालीच्या आसपास लपलेली सुंदर पर्यटन स्थळे
मनाली प्रत्येक पर्यटकाच्या बकेट लिस्टमध्ये असणारे ठिकाण आहे. परंतु यावेळी जर तुम्ही गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर ठिकाणे शोधत असाल, तर मनालीच्या आजूबाजूला लपलेली ही 4 ठिकाणे तुमच्यासाठी योग्य आहेत. शिवाय तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त कुठे फिरण्याचा प्लान करणार असाल तर, पुढील ठिकाणे एकदम परफेक्ट असणार आहेत. होय, या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही हिमाचलचे सौंदर्य जवळून पाहू शकता. तसेच निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवू शकता.
मनाली आपल्या सौंदर्यासाठी देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. यावेळी तुम्हाला गर्दीपासून दूर शांत ठिकाणी निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवायचे आहेत का? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. मनालीच्या आजूबाजूला अशी अनेक छुपी ठिकाणे आहेत जिथून तुम्हाला संपूर्ण हिमाचल प्रदेशचे सौंदर्य पाहता येते. पुढील माहितीत आम्ही तुम्हाला अशाच 4 ऑफबीट डेस्टिनेशनबद्दल सांगणार आहोत.
मलाना हिल स्टेशन (Malana)
डोंगर दरीत वसलेले मलाना गाव हिमाचल प्रदेशातील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. मनालीच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवायचा असेल तर मलाना हा एक उत्तम पर्याय आहे. हे गाव प्राचीन संस्कृती आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मनालीहून रस्त्याने तुम्ही मलानाला सुमारे २ तासात पोहोचू शकता. येथे तुम्हाला शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि टेकड्यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतील.
थानेदार (Thanedar)
ऋतू कोणताही असो, आजकाल मनालीमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी ही नवीन गोष्ट नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या ऋतूत शांत आणि निवांत ठिकाण शोधत असाल तर मनालीपासून सुमारे 190 किलोमीटर अंतरावर असलेले 'थानेदार ठिकाण' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. थानेदार हे डोंगर आणि हिरवाईने वेढलेले एक छोटेसे गाव आहे. जिथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता आणि शांतता जवळून अनुभवू शकता.
पटलीकुहल (Patlikuhal)
मनालीच्या गजबजाटापासून दूर हिमाचल प्रदेशच्या कुशीत वसलेला, पाटलीकुहल हा एक अस्पर्शित खजिना आहे. मनालीपासून अवघ्या 27 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे निर्मळ आणि सुंदर ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. पाटलीकुहल हे हिमाचल प्रदेशातील अशा ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे , जे अद्याप बहुतेक पर्यटकांनी शोधलेले नाही. तुम्हालाही गर्दीपासून दूर शांततापूर्ण वातावरणात काही वेळ घालवायचा असेल तर पाटलीकुहाळ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
सजला (Sajla)
मनालीपासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर वसलेले सजला गाव हे एक सुंदर ठिकाण आहे. जिथे निसर्गाच्या कुशीत वसलेला धबधबा आणि प्रसिद्ध विष्णू मंदिर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर मनाली ते सजला हा मार्ग तुमच्यासाठी एक रोमांचक अनुभव घेऊन येईल. या गावात जाण्यासाठी घनदाट जंगलातून जाणे हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय प्रवास असू शकतो.
Writtern By: Sakshi Jadhav