81st Master Dinanath Mangeshkar Award Announced: गेल्या अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने काही मानाचे पुरस्कार देण्यात येतात. प्रतिष्ठान दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारचे यंदाचे ८१वे वर्ष आहे. यावर्षीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 24 एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पष्णमुकानंद नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात होणार आहे.
या सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात कथक होणार आहे. तर राहुल देशपांडे यांची सुरेल मैफल देखील होणार आहे. तसेच कार्यक्रमाची सांगता हरीहरन यांच्या सादरीकरणाने होणार आहे.
यावर्षीचा लता मंगेशकर स्मृती पुरस्कार गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. संगीत पुरस्कार गायक पंकज उदास यांना प्रदान करण्यात येणार आहे. नाटक क्षेत्रातील पुरस्कार नियम व अटी लागू या नाटकासाठी निर्माते प्रशांत दामले यांना देण्यात येणार आहे.
अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री विद्या बालन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजसेवासाठी श्री सदगुरू सेवा संघ यांना तर साहित्य क्षेत्रातला ग्रंथाली प्रकाशन यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.