Indian Panorama Announces Selection Of Films For 54th IFFI
Indian Panorama Announces Selection Of Films For 54th IFFI Instagram
मनोरंजन बातम्या

International Film Festival Of India 2023: ‘द वॅक्सिन वॉर’ ते ‘द केरळ स्टोरी’; ५४ व्या इफ्फीमध्ये ‘या’ सिनेमांची होणार स्क्रिनिंग, वाचा संपूर्ण यादी...

Chetan Bodke

Indian Panorama Announces Selection Of Films For 54th IFFI

भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (International Film Festival Of India) या पुरस्कार सोहळ्याला येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे. गोव्यामध्ये २०-२८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये हा फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. यावेळी २५ फीचर फिल्म्स आणि २० नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणकोणते चित्रपट दाखवले जाणार आहे, याची यादी समोर आली आहे.

मल्याळम चित्रपट ‘अट्टम’ च्या स्क्रिनिंगने या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी फेस्टिव्हलमध्ये मराठी, हिंदीसह इतर भाषांमधील लोकप्रिय चित्रपट दाखवले जातात. या चित्रपटांमध्ये निवड निर्माते आणि दिग्दर्शक टीएस नागभरन यांच्या नेतृत्वाखाली असलेली १२ सदस्याची ज्युरी टिम करते. यावेळी मराठी चित्रपटसुद्धा दाखवण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्सवमूर्ती, प्रदक्षिणा आणि भंगार या चित्रपटांचा सामावेश आहे. (Award)

आरारीरारो, आट्टम, अर्धांगिनी, डीप फ्रिज, धाई आखर, इरट्टा, काढाल एनबाथू पोथू उदमाई, कथल, कांतारा, मलिकाप्पुरम, मंडली, मीरबीन, नीला नीरा सूरियान, नना थान केस कोडू, पुक्कलम, रवींद्र काब्य रहस्य, सना, द वॅक्सिन वॉर, वध, विदुथलाई पार्ट 1 या चित्रपटांची फीचर फिल्म्समध्ये निवड करण्यात आली आहे.

तर 1947: ब्रेक्झिट इंडिया, अँड्रो ड्रीम्स, बासन, बॅक टू द फ्यूचर, बरुआर क्सॉन्गक्सर, बेहरूपिया- द इम्पर्सोनेटर, भंगार, नानसेई निलम, छुपी रोह, गिद्ध, कथाबोर, लचित, लास्ट मीट, लाइफ इन लूम, माऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव, प्रदक्षिणा, सदाबहार, श्री रुद्रम, द सी अँड सेव्हन व्हिलेज आणि उत्सवमूर्ती या चित्रपटांचा नॉन-फीचर फिल्म्समध्ये निवड करण्यात आली आहे.

त्यासोबतच २०१८, गुलमोहर, पोन्नियिन सेल्वन २, सिर्फ एक बंदा कॉफी है, द केरळ स्टोरी या चित्रपटांचा ‘मेन स्ट्रिम सिनेमा सेक्शन’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

१९५२ पासून सुरू झालेला इफ्फी पुरस्कार सोहळा आशियातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. या फिल्म फेस्टिव्हलचे दरवर्षी गोव्यामध्ये आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम चित्रपट दाखवले जातात. गोवा सरकार आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया या फिल्म फेस्टिव्हलचं ५४ वं वर्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Voting Live Update: जनतेचा सर्व्हे आमच्याकडे, सरकारी सर्व्हे त्यांच्याकडे : मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Lok Sabha Election Exit Poll 2024 Result Live: लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Pune Porsche Crash : पुणे पोर्शे अपघात प्रकरण : माझा मुलगाच कार चालवत होता; आई-वडिलांची पोलीस चौकशीत कबुली

Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

A Valentine Day Film : अभिमानास्पद…. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’चा मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकला, Video Viral

SCROLL FOR NEXT