Shraddha Kapoor Sing Song
Shraddha Kapoor Sing SongInstagram

Shraddha Kapoor Sing Song: श्रद्धा कपूरनं दांडिया कार्यक्रमात गायलं तिचं सुपरहिट गाणं, ‘चाहूं मैं या ना’ गाण्याद्वारे जिंकली चाहत्यांची मनं

Shraddha Kapoor Video: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने नुकतंच मुंबईतल्या एका दांडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी श्रद्धाने ‘आशिकी २’ मधलं एक गाणं गायलं आहे.
Published on

Shraddha Kapoor Sing Song

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री. श्रद्धाने आजवर अनेक चित्रपटांमधून चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. ‘आशिकी २’ असो किंवा काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेला ‘तू झूठी में मक्कार’ असो. श्रद्धाने कायमच आपल्या दमदार अभिनयातून चाहत्यांचे लक्ष वेधले. एक उत्तम अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकाही आहे. नुकतंच अभिनेत्रीने मुंबईतल्या एका दांडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्रीने ‘आशिकी २’ मधलं एक गाणं गायलं आहे. सध्या त्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shraddha Kapoor Sing Song
Bigg Boss Contestant Arrest: ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ स्पर्धकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी २’ मधून श्रद्धा कपूरला बरीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर ही प्रमुख भूमिकेमध्ये होता. या चित्रपटातील ‘चाहूं मैं या ना’ हे गाणं आजही सोशल मीडियावर कमालीचं हिट आहे. हे गाणं श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरवर चित्रित करण्यात आले आहे. हेच गाणं तिने मुंबईतल्या दांडिया कार्यक्रमामध्ये गायलं आहे. तिच्या आवजावर चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिलेला आहे. यावेळी उपस्थितांनी तिच्या गाण्याला टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देत गाण्याचे कौतुक केले.

सध्या हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी श्रद्धाने कार्यक्रमामध्ये पीच रंगाची साडी, कानामध्ये झुमके, हातात बांगड्या आणि ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला होता. यावेळी कार्यक्रमामध्ये आपल्या मधुर आवाजाने सर्वांचेच मने जिंकले. दरम्यान, अभिनेत्रीने मुंबईमधील एका दांडिया कार्यक्रमाला नवमीच्या दिवशी हजेरी लावलेली होती. (Shraddha Kapoor)

Shraddha Kapoor Sing Song
Shraddha Kapoor Dating Rumours: श्रद्धा कपूर पडली प्रेमात , ‘तू झुठी मैं मक्कर’च्या लेखकाला करतेय डेट?

श्रद्धा कपूर अखेरची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात दिसली होती. यासोबतच आता लवकरच श्रद्धा राजकुमार रावच्या ‘हॉरर स्त्री २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमर कौशिक यांनी केली आहे. तर जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हॉरर स्त्री २’मध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी सारख्या बड्या सेलिब्रिटींची फौज चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Shraddha Kapoor Sing Song
Upcoming Movie And Web Series: अ‍ॅस्पिरेन्ट्स २, दुरंगासह ओटीटीवर रिलीज जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरीज; पाहा संपूर्ण लिस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com