School Children 
शिक्षण

पहिली ते आठवी चे विद्यार्थी सरसकट पुढच्या इयत्तेत!

साम टीव्ही ब्युरो

पुणे: गेल्या वर्षभरात राज्यात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन (Online), तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण कोरोनामुळे (Corona) मिळाले आहे. बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम अद्याप पूर्ण शिकवून झालेला सुद्धा नाही. The state government has decided to send 1st to 8th standard students in next class

परिणामी राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन (Annual valuation) करणे शिक्षण विभागाला शक्य नाही. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांने वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. 

कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून सर्वत्र शाळा बंद आहेत. राज्यात काही भागात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग काही प्रमाणात उपस्थिती च्या नियमाने  सुरू झालेले होते.

परंतु लहान वर्ग म्हणजेच इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग वर्षभरात सुरू होऊ शकलेले नाहीत. तसेच विविध गोष्टींच्या अभावामुळे अभ्यासक्रमही पूर्णपणे शिकवून झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे न्यायाचे राहणार नाही, त्यामुळे मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात (वर्गोन्नती) पाठविण्यात यावे, असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शनिवारी दुपारी जाहीर केला. The state government has decided to send First to Eight standard students in next class

ऑनलाइन (Online Education) पद्धतीने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष संपत असले असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न राज्यातील सर्व  शिक्षकांसमोर उभा होता. सद्य शहरी भागात अनेक शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. पण निकालाच्या, मूल्यमापनाच्या कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतिम सूचनांची प्रतीक्षा शाळांना लागली होती. परंतु गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका जाहीर केल्याने शाळांची ही प्रतीक्षा आज शनिवारी पूर्ण झाली. The

Edited by- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या पतीला टॉर्चर केलं, ते आत्महत्या करणारच नाहीत; जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा दावा

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT