youth arrested who forced friends to convert religion in sambhajinagar Saam Tv
क्राईम

Sambhajinagar: धर्मांतराच्या धास्तीने दाेघांनी गाठलं पाेलिस ठाणे, सुदानच्या युवकास अटक

युवकाच्या कॉल डिटेल्स, इंटरनेटचा वापर आणि बँकेची माहिती याचा खोलवर तपास करण्यात येत आहे.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhajinagar :

दोन मित्रांच्या धर्मांतर प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे पाेलिसांनी एका विदेशी युवकास अटक केली. ओसामा अली युसुफ अहमद असे युवकाचे नाव आहे. त्यास पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 23 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ओसामा अली युसुफ अहमद हा सुदान देशातील आहे. शहरातील हडको भागातील दहावीत शिकणाऱ्या दोन मित्रांना त्याने घरी बाेलावले हाेते. त्यांना तेथे त्याने कोंडून ठेवले.

या दाेघांनी पाेलिसांना दिलेल्या माहितीनूसार ओसामा अली युसुफ अहमद याने त्यांना इस्लाम धर्मात बळजबरी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करू लागला. आम्ही घाबरलाे. सावधगिरी बाळगत तेथून पळ काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान दाेघांनी थेट पोलिस ठाणे गाठत सगळा प्रकार कथित केला. त्यानंतर पाेलिसांनी ओसामा अली युसुफ अहमद याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याककडून दोन बंद मोबाईल आणि धार्मिक साहित्यासह त्याचा पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याशिवाय त्याचे कॉल डिटेल्स, इंटरनेटचा वापर आणि बँकेची माहिती याचा खोलवर तपास करण्यात येत आहे.

काॅलेजला गेलाच नाही

ताे शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सन 2022 दरम्यान आला आहे. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात त्याने प्रवेशही घेतला परंतु एकही दिवस ताे कॉलेजमध्ये गेला नाही अशी माहिती पाेलिसांना प्राप्त झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

SCROLL FOR NEXT