Private photos blackmail SAAM TV
क्राईम

Crime : जीम ट्रेनरनं महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, प्रायव्हेट फोटो काढले अन्...

Private photos blackmail: सूरतमध्ये जिम ट्रेनरने महिलेचा विश्वास जिंकून तिचे खासगी फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखांची मागणी केली. तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सूरतमधून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. जिममध्ये वर्कआउटसाठी जाणाऱ्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा गैरफायदा घेत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जिम ट्रेनरला अटक केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सूरत शहरातील सिटीलाइट परिसरात राहणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील महिला दररोज जीममध्ये जात होती. याच जिममध्ये शब्बीर असगर ट्रंकवाला नावाचा व्यक्ती ट्रेनर म्हणून कामाला होता. त्याने गोड बोलून आणि विश्वास जिंकून त्या महिलेला स्वतःच्या प्रेमजाळ्यात ओढलं. गेल्या सुमारे सात वर्षांपासून त्यांच्यात संपर्क होता.

दरम्यान, महिलेच्या पतीला त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव जाणवू लागला. त्यांनी या प्रकरणाची शंका आल्यावर संबंधित जिम ट्रेनरशी संपर्क साधला. मागील सात महिन्यांत त्यांनी अनेकदा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या काळात शब्बीरने परिस्थितीचा फायदा घेत ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचं समोर आलंय.

महिलेचे काढले प्रायव्हेट फोटो

आरोपीने महिलेचे काही प्रायव्हेट फोटो काढले होते. या फोटोंद्वारे तो महिलेच्या आयुष्यात हस्तक्षेप करू लागला आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करू लागला. जेव्हा महिलेच्या पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने उघडपणे धमक्या देण्यास सुरुवात केली.

फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत यासाठी आरोपीने महिलेच्या पतीकडून तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली. इतकंच नाही तर त्याने पतीला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे पतीने सूरत SOG पोलिसांनी जिम ट्रेनर्ससाठी घेतलेल्या बैठकीबाबतची बातमी पाहिली आणि त्वरित पोलिसांकडे धाव घेतली.

यानंतर पतीने पाल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सूरत SOG पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शब्बीर असगर ट्रंकवालाला अटक केली. पोलीस तपासात असंही समोर आलंय की, पतीने अनेकदा आरोपीला भेटून फोटो व्हायरल करू नये अशी विनंती केली होती.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सूरत SOG चे डीसीपी राजदीप सिंह नकुम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वीच जिम ट्रेनर्स आणि जिम मालकांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. ट्रेनरची नेमणूक करताना त्यांची पार्श्वभूमी तपासणं आवश्यक आहे. तसेच जिममध्ये येणाऱ्या महिलांशी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक संबंध ठेवू नये, असे निर्देशही देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Politics : तमिळनाडूमध्ये पेच वाढला, TVK प्रमुख विजय यांचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, पण बहुमत कसं मिळवणार?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळाराम मंदिरावर फडकणार धर्मध्वज

Crime: बायकोसोबत कडाक्याचे भांडण, नवऱ्याने स्वत:चं गुप्तांग कापलं

तमिळनाडूमध्ये राजकीय घडमोडींना वेग; थलपती विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Signs Before Death: मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं हे ६ संकेत, जाणून घ्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचं सत्य

SCROLL FOR NEXT