Pune Koyta Gang: Saam Tv
क्राईम

Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच, कँम्प परीसरात वाईन शॉपची तोडफोड; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Girish Nikam

सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यात काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय. ड्रग्ज तस्करी, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, ससूनमधील गैरकारभार ते शहरात भर दिवसा होणारे कोयता गँगचे हल्ले यामुळे कायदा सुव्यवस्थेचे अक्षरक्षा धिंडवडे निघालेत.

ताज्या घटनेत पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पहायला मिळाली आहे. कॅम्प परिसरात या गँगनं वाईन शॉपची तोडफोड केलीय. 4 ते 5 अज्ञातांनी वाईन शॉपची तोडफोड केलीय. दहशत माजवण्याच्या या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गेल्या महिन्याभरात शहराच्या विविध भागात कोयता गँगने धुडगूस घातलाय. या गँगने नुकतीच हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील अनेक दुकानांची तोडफोड केली. रस्त्यावरील वाहनांच्याही काचा फोडल्या. गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांपैकी 3 जण अल्पवयीन मुले आहेत. दुसरीकडे पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात तिघांनी पानटपरीवाल्यावर हल्ला करत त्याला जखमी केलाय.

लोहगाव परिसरातही कोयता गँगची दहशत पहायला मिळतेय. कोयता भिरकवत 'आम्ही इथले भाई' असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली आहे. चनाराम चौधरी यांच्या दुकानाची तोडफोड केली आहे.

सिंहगड रोड परिसरातही 30 ते 40 गुंडांनी एका तरुणावर हल्ला केलाय. पुण्यातल्या या घटनांवरुन खासदार संजय राऊत यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोयता गँगचे सूत्रधार बसलेत, असा घणाघात केला होता.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कोयत्या हल्ल्याच्या घटनांचं सीसीटीव्ही फूटेज प्रसार माध्यमांना द्यायचे नाही, असा आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे पुणे पोलिसांकडून घटनेच्या ठिकाणाचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला जातो. ती दृश्ये माध्यमांना दिली जात नाहीत. त्यामुळे अशा गुन्ह्याच्या घटना कमी झाल्यात असं भासवण्याचा प्रकार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार करताना दिसतात, असा आरोप होतोय. ससूनमधले गैरकारभार आणि ड्रग्ज तस्करीने पुण्याची प्रतिमा डागाळली आहे. पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात शांतता राहावी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचं मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT