Amravati Crime Saam tv
क्राईम

Crime News: बायकोनं फक्त १२०० रूपयांत नवऱ्याचा काटा काढला, मावस भावालाच दिली सुपारी, अमरावतीमध्ये खळबळ

Amravati Police: अमरावतीमध्ये बायकोनेच नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी सुपारी दिल्याची घटना घडली. अवघ्या १२०० रुपयांमध्ये तिने नवऱ्याला मारहाण करण्यासाठी आणि लुटण्यासाठी मावस भावाला सुपारी दिली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.

Priya More

अमर घटारे, अमरावती

नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी बायकोने सुपारी देत त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीच्या खोलापुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. नवऱ्याला उद्दल घडवण्याचा कट रचत १२०० रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने मावसभावालाच ही सुपारी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बायकोसोबत दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवून हॉकी स्टिकने मारहाण करत त्याच्याकडे असलेला ९५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. ही घटना अमरावतीच्या खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना जी माहिती समोर आली ते पाहून पोलिसही चक्रावले.

या मारहाण आणि लुटमारी प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडला यश आले आहे. अवघ्या १२०० रुपयांत बायकोनेच पतीला बेदम मारहाण करून त्याला अद्दल घडविण्याची सुपारी दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले. मावसभावाच्या मदतीने तिने नवऱ्याला लुटल्याचे तपासातून समोर आले. लग्नाआधी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यामुळे नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी महिलेने हे कृत्य केले.

या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीच्या बायकोसह तिचा मावसभाऊ आणि त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक केली. येरला येथील रहिवासी व्यापारी अजय संजय राठी हे पत्नीसोबत दुचाकीने अकोली रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्याचवेळी तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केले होते आणि त्यांच्याकडचे ऐवज लुटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT