Husband Wife Crime News Husband Wife Crime News  AI Photo News
क्राईम

Crime : बॉयफ्रेंडसोबत बोलण्यास रोखलं, संतापलेल्या बायकोनं नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

Bihar Crime News : बायको प्रियकरासोबत फोन बोलत होती, नवऱ्याने तिला रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले.

Namdeo Kumbhar

Husband Wife Crime News : बायकोचं अफेअर असल्याचे नवऱ्याला समजले. नवऱ्याने बायकोला त्याच्यासोबत बोलण्यास रोखलं. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. घटनास्थळीच नवऱ्याचा (मिथलेश पासवान) मृत्यू झाला. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बोयकोला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत मिथलेश पासवान याला तीन मुले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथलेश पासवान मजुरीचे काम करून कुटुंबाचे पोट भरत होते. ऋतिक, रिशु आणि निशांत कुमार ही तीन मुले त्याला होती. होळी खेळून मिथलेश पासवान जेव्हा घरी आला त्यावेळी बायकोला दुसऱ्यासोबत बोलताना पकडले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशीच ही भयंकर घटना घडली.

नवऱ्याचे गुप्तांग कापले-

होळीच्या दिवशी मिथिलेश पासवान आणि पत्नी प्रियंका देवी यांच्यामध्ये फोनवर बोलण्यावरून कडाक्याचे भांडण झाले. प्रियंका बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती, त्यावर मिथिलेशने आक्षेप घेतला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. संतापलेल्या प्रियंकाने मिथिलेश याच्या गुप्तांगवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मिथिलेश गंभीर जखमी झाला अन् जागेवरच जीव सोडला.

बायकोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या -

बायकोनं गुप्तांगावर हल्ला केला, त्यामध्ये मिथिलेश गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी मिथिलेश याला लालगंज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिथिलेश याचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला अन् प्रियंका हिला बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. बायकोनं नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी परसली अन् एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

SCROLL FOR NEXT