Uttar Pradesh crime Saam TV
क्राईम

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

Uttar Pradesh crime: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून दिव्यांग ई-रिक्शा चालकाची हत्या करण्यात आली. आरोपीने गळा आवळून खून करून मृतदेह शेतात फेकला होता. पोलिसांनी ३७ दिवसांनंतर आरोपीला अटक करून प्रकरणाचा छडा लावला.

Surabhi Jayashree Jagdish

बदायूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपीला अटक केलीये. या प्रकरणात पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून दिव्यांग ई-रिक्शा चालकाची हत्या करण्यात आली होती. तब्बल ३७ दिवसांनंतर या प्रकरणाचा छडा लागला.

बिसौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलडिया गावातील सिंकू उर्फ मुकेश याने पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आंवला भागातील आसपूरमधील दिव्यांग चंद्रप्रकाश याची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. आरोपीने चंद्रप्रकाशचा गळा दोरीने आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपी सिंकूला अटक केली आहे.

३७ दिवसांनंतर प्रकरण उलगडलं

सुमारे ३७ दिवसांपूर्वी सेंधी-ख्योराजपूर मार्गावरील गव्हाच्या शेतात चंद्रप्रकाशचा मृतदेह सापडला होता. हा व्यक्ती रिक्शा चालवून त्याचं पोट भरत होता. ३० मार्च रोजी कीरतपूर गावातील विंद्र सिंह यांनी सोमपाल यांच्या शेतात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम करून तपास सुरू केला. मृताची ओळख चंद्रप्रकाश अशी पटली होती. त्याचे वडील वीरपाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान सिंकूच्या पत्नी शिवानी आणि चंद्रप्रकाश यांच्यात संबंध असल्याची माहिती समोर आली. याच कारणावरून सिंकू चंद्रप्रकाशवर राग धरून होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी चंद्रप्रकाशला सोबत नेऊन दारू पाजली. त्यानंतर पत्नीशी बोलू नकोस असं सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापलेल्या सिंकूने चंद्रप्रकाशचा दोरीने गळा आवळून हत्या केली.

मृतदेह शेतात फेकला

हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह शेतात फेकला आणि ई-रिक्शा घेऊन बरेलीकडे पळ काढला. त्यानंतर तो दादरीमध्ये जाऊन लपला होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री सरदार नगरकडे जाणाऱ्या कटजवळून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून रिक्शाही जप्त केलीये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT