Wardha Girl Suicide  Saam Tv News
क्राईम

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Wardha Girl Suicide : वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे आपल्या पत्नी, मुलगा आणी मुलगी सोबत राहतात. वासुदेव हे शेतमजूरीचं काम करून आपली उपजीविका चालवतात. तर त्यांचा मुलगासुद्धा बाहेर कामावर जातो.

Prashant Patil

वर्धा : एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी आपल्या लेकीचा बारावीला प्रवेश न घेतल्यानं विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावातली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोनिया (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे आपल्या पत्नी, मुलगा आणी मुलगी सोबत राहतात. वासुदेव हे शेतमजूरीचं काम करून आपली उपजीविका चालवतात. तर त्यांचा मुलगासुद्धा बाहेर कामावर जातो. वासुदेव यांची १७ वर्षीय मुलगी सोनिया ही वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती. ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती. सोनियाचे अकरावीचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्यानं ती घरी आली होती. सोबतच सणवारला सुद्धा ती घरी यायची. एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्यानं ती घरीच होती. यावर्षी ती बारावीत गेल्यानं आणि शाळा सुरु झाल्यानं वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती. वडील आर्थिक अडचणीत असल्याने ते 'तू काही दिवस होस्टेलमध्ये राहा, पैशांची व्यवस्था करून प्रवेश घेऊन देतो' असं सांगत होते. मात्र, अशातच आई, वडील आणि भाऊ कामावर गेल्यानं घरी कोणीच नसल्यालं तिने पैशांअभावी आणि १२वीला प्रवेश न झाल्यानं हताश होऊन घरातील बाथरूमच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचं दार त्यांना उघडं दिसलं. वडिलांनी पाहणी केली असता घरात कोणी दिसलं नाही. तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणि घरातील मधलं दार लावलं असल्याचं पाहिलं. मुलाने घराच्या मागील बाजूनं जाऊन पाहिलं असता बाथरूममध्ये त्याची बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुलगाव पोलीस तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT