Tobacco smuggling Samruddhi Highway saam tv
क्राईम

Wardha Crime: बूट आणि इलेक्ट्रिक साहित्यातून तंबाखूची तस्करी, समृद्धी महामार्गावर तस्करांची टोळी गजाआड

Tobacco smuggling Samruddhi Highway: सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता दिल्लीकडून येणारा ट्रक पकडला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

दिल्लीवरुन मुंबई येथे कंटेनरमधून जोडे आणि इलेक्ट्रीक साहित्याच्या आडून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधित तंबाखूची सुरू असलेली तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळली. सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. यात चालकासह एकाला पोलिसांनी अटक केली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शाहीद ईलीयास (३२), हाकमखॉन शाकिरखॉन (२२) दोन्ही रा. अडवर, जि. नुह(मेवात)राज्य हरियाणा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दीपक ट्रान्सपोर्टचे मालक, विकास छाबडा रा. दिल्ली, कंटेनर मालक अशिना विकास छाबडा रा. दिल्ली अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावरुन प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सापळा रचला असता दिल्लीकडून येणारा आरजे. ५२ जी.ए. ५६७० क्रमांकाचा कंटेनर येत होता. पोलिसांनी कंटेनरला थांबवून पाहणी केली असता कंटेनरमध्ये समोरील भागात इलेक्ट्रीक साहित्य आणि जोडे होते. मात्र, त्याच्या मधात सुमारे ७० लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू लपवून असल्याचे दिसले.

हा तंबाखू दिल्ली येथून समृद्धी महामार्गाने मुंबई येथे जात असल्याचे सांगितले. तसेच हा माल दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली यांचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुगंधीत तंबाखूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले कंटेनर असा एकूण एक कोटी सहा लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला होता. सिव्हिल ड्रेसमध्ये पाळत ठेवणाऱ्या पोलिसांनी कंटेनरला थांबवून चालकाला विचारणा केली असता चालकाने बोअरिंगचे साहित्य, जोडे आणि इलेक्ट्रीक वायर असल्याचे सांगत त्याच्या पावत्या देखील दाखवल्या. त्यांच्याकडे दोन पावत्या होत्या एक पावती मुंबई आणि दुसरी तामिळनाडू येथील सेलस येथील होत्या. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता समोर बोअरिंग साहित्य, इलेक्ट्रीक वायर आणि जोडे समोर होते. मात्र, त्याच्या मधात तंबाखूसाठा लपवून असलेला दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT