Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घरामध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

  • महिला पोलिसाच्या मुलीसोबत ही भयंकर घटना घडली

  • याप्रकरणी सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली

उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सावत्र बापाने या मुलीसोबत हे संतापजनक कृत्य केले. महिला पोलिसाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी शाळेमध्ये शिकते. तिची आई उत्तर प्रदेश पोलिस दलात कार्यरत आहे. पीडित मुलगी आईसोबत भाड्याच्या घरात राहते. या महिलेचा दुसरा नवरा देखील त्यांच्यासोबत राहतो. आरोपीने २५ डिसेंबरला पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने शाळेतील एका मैत्रिणीला घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने शाळेच्या शिक्षिकेला ही गोष्ट सांगितले.

या भयंकर घटनेबद्दल ऐकून शिक्षिकेला हादरला बसला. तिने पोलसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी तिने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेडया ठोकल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT