UP Crime News Saam Tv
क्राईम

UP Crime News: दारु पिण्यास हटकल्याने भयंकर कृत्य, टोळक्याकडून सख्ख्या भावांची निर्घृण हत्या; ६ जणांना अटक

Crime News: उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये दोघा सख्ख्या भावांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दारु पिण्यास अडवल्याने हे भयंकर हत्याकांड केल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime:

देशभरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन हत्या, खूनांचे प्रकार घडत आहेत. उत्तरप्रदेशमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये दोघा सख्ख्या भावांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दारु पिण्यास अडवल्याने हे भयंकर हत्याकांड केल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News in Marathi)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूरमध्ये मंगळवारी (२८, नोव्हेंबर) रात्री दोन सख्ख्या भावांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या काही तासात सहा जणांना अटक केली आहे. अजय प्रजापती आणि अंकित प्रजापती अशी या हत्या झालेल्या दोघा भावांची नावे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, खेतसराय येथील बाभनौती वॉर्डातील रहिवासी अजय प्रजापती आणि त्याचा लहान भाऊ अंकित प्रजापती हे घरापासून काही अंतरावर खुटाहन रोडवरील दुर्गा मंदिराजवळ फास्ट फूडचे दुकान चालवायचे. वॉर्ड नगरसेवक अमित सोनकर यांच्या बहिणीच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी हल्लेखोर तरुण हे त्यांच्या गावात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले काही पाहुणे अजयच्या दुकानात पोहोचले आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. त्यांना दारु पिण्यास अडवल्याने बाचाबाची होऊन दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत घटनेतील सहा फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपींना पकडताना झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झालेत.या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

SCROLL FOR NEXT