Crime News
Crime News Saam Tv
क्राईम

Uttar Pradesh Crime News: 'बायको आजारी आहे, ५००० द्या', म्हणत घरात शिरला अन् ३ चिमुकल्यांवर केले सपासप वार, दोघांचा मृत्यू

Rohini Gudaghe

Police Encounter In Uttar Pradesh

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये दोन मुलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने घरात घुसून दोन मुलांची हत्या (Crime News) केली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला चकमकीत ठार केले. या घटनेने बदाऊन चांगलंच हादरलं आहे. तर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे.  (latets political news)

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये बाबा कॉलनीत एका व्यक्तीने दोन मुलांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच आरोपीचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न (Uttar Pradesh Crime ) केला. आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही आरोपीला प्रत्युत्तर देत गोळीबार केला, यामध्ये आरोपी ठार झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बदायूमध्ये दुहेरी हत्याकांड

बदायूचे डीएम मनोज कुमार यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मंडी समिती चौकीजवळील बाबा कॉलनीत एका व्यक्तीने घरात घुसून दोन लहान मुलांची हत्या केल्याची माहिती मिळाली (Police Encounter) होती. त्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यांनी नागरिकांनाशांतता राखण्याचे आवाहन केले होते. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरू केला. यानंतर झालेल्या (Man Killed Two Boys) चकमकीमध्ये आरोपीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीचे वय 25 ते 30 वर्षांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीच्या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.

नक्की काय घडलं?

ही घटना मंगळवारी (१९ मार्च) रात्री ८ वाजता घडली, अशी माहिती डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिली आहे. साजिद नावाचा व्यक्ती त्याच्या दुकानासमोरील विनोद सिंह यांच्या घरी गेला होता. त्यानंतर त्याने विनोद सिंह यांच्या पत्नीकडे त्याने बायको आजारी असल्यामुळे पाच हजार रूपयांची मदत (Police Encounter In Budaun) मागितली. तिने पती विनोदला फोन केला. तोपर्यंत आरोपी घराच्या टेरेसवर गेला. तिथे विनोदची मुले खेळत होती. अचानक त्याने या तीन मुलांवर हल्ला केला. त्याने कुऱ्हाडीने वार करत त्यांच्या दोन मुलांची हत्या केली. तिसरा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी पोलीस चकमकीत मारला गेला.

साजिदने १२ वर्षांचा आयुष, ८ वर्षांचा आहान उर्फ ​​हनी आणि युवराज यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले (Uttar Pradesh Crime News) होते. यामध्ये आयुष आणि अहान यांचा मृत्यू झालाय, तर युवराजला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. ही घटना सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या मंडई पोलीस चौकीपासून काही अंतरावर घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT