UP News : सलूनवाल्याने घरात घुसून दोघा सख्ख्या भावांची केली हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर

UP Crime News : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे.
UP News
UP News Saam Digital
Published On

UP News

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने तीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे बदायूंतील अनेक भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक पोलीस ठाण्यांतील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद हा सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत सलूनचे दुकान चालवत होता. मंगळवारी सायंकाळी त्याने अन्नू (11) आणि आयुष (6) या दोन भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली, तर एका मुलाला गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी जावेद फरार झाला. माहिती मिळताच तेथे आलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. मृत मुलांच्या नातेवाइकांनी मंडई समिती चौकात मुलांचे मृतदेह टाकून रास्ता रोको केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

UP News
Lok Sabha Election 2024 : प्रियंका गांधी लढणार रायबरेलीतून निवडणूक? उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या १७ जागांवर काय आहे स्थिती? जाणून घ्या

पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी गोंधळ घालत तोडफोड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून डीएम-एसपीसह अनेक पोलिस ठाण्याचे फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

UP News
BMC News : या महानगरपालिकेचे तब्बल ५० हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात; पालिकेच्या कारभाराचं काय होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com