
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेस आणि सपाने हातमिळवणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीच्या जागा वाचवण्यासाठी काँग्रेसने अखिलेश यादव यांचं १७ जागांवर एकमत झालं आहे. मात्र, अद्याप दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर न झाल्याने सस्पेंस वाढत आहे. गांधी घराण्यातील कोणीही यूपीमधून निवडणूक लढवणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र आता यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील जागांवर काँग्रेसमध्ये दिल्लीत खलबते सुरू आहेत. आधी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली, तरीही उत्तर प्रदेशबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. काँग्रेसला यूपीत 17 जागा मिळाल्या आहेत.उद्यापासून यूपीच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होणार आहे. यापैकी सहारनपूरची जागा काँग्रेसला मिळाली आहे. इम्रान मसूद तेथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाची धडपड सुरू आहे. महाराजगंजच्या जागेवर पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणत उतरवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. दरम्यान, ताकदवान नेते अमन मणी त्रिपाठी यांचा पक्षात समावेश करण्यात आला. अमर मणि त्रिपाठी यांचे पुत्र आहेत. मात्र त्यांच्या नावावरूनही वाद होऊ शकतो, असे पक्षाला वाटत होते. त्यामुळे त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता तेथून आमदार वीरेंद्र चौधरी यांना निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. नकुल दुबे यांच्यासाठी सीतापूरची जागा समाजवादी पक्षाकडून घेण्यात आली होती. त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली. या दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते प्रमोद वर्मा यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र भाजपचे माजी आमदार राकेश राठोड यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे रायबरेलीत काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. काँग्रेससचा हा पारंपरिक मतदारसंघ. काँग्रेस पक्षाची सर्व मदार असलेले राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर प्रियंका गांधी प्रचार करतील अशी शक्यता होती. त्यामुळे रायबरेलीतून भाजपला टक्कर देण्यासाठी कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांच लक्ष लागलं होतं.
दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी, प्रियंका गांधी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवतील. रायबरेलीतही आम्ही यासाठी तयारी करत आहोत. बूथपासून ते जिल्हा स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असल्यांच म्हटलं आहे. त्यामुळे प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवातजीव आला आहे. भाजपने रायबरेलीमधून अद्याप उमेदवार दिलेला नाही. सोनिया गांधी या येथून सातत्याने निवडणूक लढवत आहेत, त्या आता राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.