Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य केले. लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपीने मुलीचे दोन्ही स्तन कापले.

Priya More
  • लग्नाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

  • उत्तर प्रदेशात प्रेमप्रकरणातून मुलीवर भयंकर हल्ला

  • तरुणाने मुलीचे अपरहण केले

  • या मुलीचे दोन्ही स्तन आरोपीने कापले

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य केले. लग्नाला नकार दिल्याचा राग आल्याने तरुणाने मुलीला झाडाला बांधून तिचे दोन्ही स्तन कापले. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात बेनीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुणाचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण १७ वर्षीय मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने आधी मुलीचे जबरदस्तीने अपहरण केले. तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला एका झाडाला बांधले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने तिचे कपडे काढून आरोपीने तिच्या स्तनांना तोंडाने चावा घेतला.

त्यानंतर आरोपी पीडित मुलीला अर्धमेली अवस्थेत तिथेच सोडून पळून गेला. त्यानंतर मुलगी त्याच्या तावडीतून सुटून घरी आली. समाजात बदनामी होईल या भीतीने तिने घरात कुणालाच काही सांगितले नाही. पण नंतर तिला प्रचंड त्रास होऊ लागल्यानंतर तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. बऱ्याच वेळा पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्यानंतर पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पीडित मुलीने सांगितले की, 'आरोपी तरुण माझ्या गावात राहतो. ११ मे रोजी मी एका लग्नाहून परत येत असताना त्याने मला जबरदस्तीने एका निर्जनस्थळी नेले. जंगलात तो मला घेऊन गेला. त्याने मला एका झाडाला बांधले. तो मला वारंवार एकच प्रश्न विचारत होता की तू माझ्याशी लग्न करशील की नाही? लग्नाला नकार दिल्यानंतर त्याने माझ्यासोबत भयंकर कृत्य केले. तर दुसरीकडे आरोपीचे म्हणणे आहे की, गेल्या ३ वर्षांपासून त्याचे त्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून ४६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेनीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT