मुझफ्फरनगरमध्ये मोठा दरोडा उघड
भावोजीचाच सहभाग, ७ आरोपी अटकेत
राष्ट्रीय नेमबाजही गुन्ह्यात सहभागी
पोलिसांनी दागिने व शस्त्रे जप्त
Uttar Pradesh Robbery News उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका भावोजीने आपल्या मेहुण्याच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. आरोपीच्या मेहुण्याने त्याला घरात जमिनीखाली पुरलेले वडिलोपार्जित सोने-चांदी असल्याची माहिती दिली होती आणि याचाच फायदा घेऊन आरोपी भावोजीने दरोडा टाकण्याचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी एका राष्ट्रीय नेमबाजी करणाऱ्या तरुणासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी शहरातील कोतवाली भागातील पिन्ना गावचे रहिवासी असलेल्या रवी यांच्या घरावर गुन्हेगारांनी दरोडा टाकला. रवी यांची पत्नी घराबाहेर असताना, गुन्हेगारांनी रवी आणि त्यांच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपींनी घर खोदले, लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले आणि पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक पथके तयार केली. तपासादरम्यान, एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी अनुज याच्यासह सात जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका राष्ट्रीय नेमबाजाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक कार, बनावट नंबर प्लेट, बेकायदेशीर शस्त्रे आणि चोरीचे सोन्या- चांदीचे दागिने जप्त केले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी चोरीचा माल विकण्याच्या तयारीत होते, परंतु तसे करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. एएसपी सिद्धार्थ के. मिश्रा यांनी सांगितले की, या दरोड्यात एका जवळच्या नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्याने आरोपींना दागिन्यांबद्दल माहिती दिली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.