Uttar Pradesh Crime  Saam tv
क्राईम

Crime: आईस्क्रीमचे पैसे मागितल्याने राग डोक्यात गेला, विळ्याने तरुणाचे शिर धडावेगळं केलं, चुलीत भाजलं अन्...

Utar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. पैसे मागितल्याने आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या करण्यात आली. विळ्याने हल्ला करत शीर धडावेगळं करण्यात आले. त्यानंतर ते चुलीत भाजण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये आईस्क्रीम विक्रेत्याची निर्घृण हत्या

  • पैशांवरून झालेल्या वादातून घडली घटना

  • आरोपीने विळ्याने शीर धडावेगळं केलं

  • शीर चुलीत भाजण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आईस्क्रीमवाल्याची निर्घृण हत्या केली. बाराबंकी जिल्ह्यातील सरयू नदीच्या पलीकडे वसलेल्या परसावल गावात ही घटना घडली. आईस्क्रीम खाल्ल्याचे पैसे मागितल्यामुळे हा व्यक्ती संतप्त झाला. त्याने विळ्याने आईस्क्रीम विक्रेत्याच शीर धडावेगळं केलं. हत्येनंतर आरोपीने आईस्क्रीम विक्रेत्याचे शीर चुलीतर टाकले आणि ते भाजत होता. दिवसाढवळ्या ही घटना घडली. या घटनेच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी परसावल गावात ही घटना घडली. बेहटा गावातील रहिवासी असलेल्या बबलू राजभर (वय २६ वर्षे) हा आपल्या १२ वर्षांच्या चुलत भावासोबत घरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या परसावल गावात आईस्क्रीम विकायला गेला होता. तो परसवाल गावातील माजरा नैपुरा परिसरात फिरून आईस्क्रीम विकत होता. याचदरम्यान, गावात राहणाऱ्या शंकर यादव (वय ५२ वर्षे) याने त्याच्याकडून ३ आईस्क्रीम घेऊन खाल्ल्या. जेव्हा बबलू राजभरने आईस्क्रीमचे पैसे मागितले तेव्हा तो भांडायला लागला.

त्यानंतर संतप्त झालेल्या शंकरने जवळच्या एका घरात जाऊन विळा घेऊन आला. या विळ्याने त्याने बबलूच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बबलू खाली पडला. बबलू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. आरोपी शंकर ऐवढ्यावर न थांबता त्याने बबलूचे शीर धडावेगळं केलं.

आरोपी बबलूचे शीर घेऊन गेला आणि तो चुलीत ते भाजू लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहिले तर आरोपी घरामधील चुलीवर बबलूचे शीर भाजत होता. पोलिसांना त्याला तात्काळ अटक केली. पोलिसांनी आरोपीला विचारले की तू हे असं कार करत आहे. तर त्याने उत्तर दिले की मी हे शीर शिजवून खाणार होतो. आरोपीच उत्तर ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. आईस्क्रीमचे पैसे न दिल्यामुळे सुरू झालेल्या वादातून आरोपीने तरुणाची हत्या केली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगली कारागृहात राडा! १६ जणांकडून दोन कैद्यांवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् विटा डोक्यात घातल्या

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरात प्रकरण, SIT चे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी कोर्टात दाखल

WhatsApp चा मोठा धमाका! AI फीचरमुळे चॅटिंग बदलणार, नेमकं काय होणार? वाचा...

Video : "सासूबाईंनी लावली शेंडी..." लोकलमध्ये महिलांचा भन्नाट डान्स; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? दगडफेकीनंतर दिव्यांगाला टोळीकडून मारहाण, ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT