Manasvi Choudhary
आजकाल वजन वाढीसोबत चेहऱ्याच्या फॅटमुळे महिला व पुरूष त्रस्त आहेत. फेस फॅटमुळे चेहऱ्यावर डबल चिन येते.
चेहऱ्यावरील वाढलेल्या चरबीमुळे सौंदर्य खराब दिसते. यासाठी तुम्ही घरीच सोप्या उपायाने चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करू शकता.
चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
आहारात फळे, भाज्या, प्रथिने आणि फायबरचा प्रमाण वाढवणे महत्वाचे आहे. बाहेरील तिखट, तेलकट पदार्थामुळे चेहऱ्यावरची चरबी वाढू शकते ते खाणे टाळा.
रोजच्या आहारात कमी कॅलरीज असलेले पदार्थ खाणे सुरू करा यामुळे वजन नियंत्रणात राहील. संत्री, सफरचंद, कलिंगड ही फळे खा
अनेकांना मीठ अधिक खाण्याची सवय असते. आहारातील सोडियमचे प्रमाण शरीराची चरबी वाढवतात. मीठामुळे शरीरातील पाणी साठून राहते यामुळे चेहरा सुजलेला दिसतो.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे 'वॉटर रिटेंशन' होते, ज्यामुळे चेहरा सुजल्यासारखा दिसतो. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
सकाळी कोमट पाण्यात लिंबू किंवा डिटॉक्स ड्रिंक्स घेतल्याने चेहऱ्याची सूज झपाट्याने कमी होते.
मैदा, पांढरा भात, केक आणि गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे यामुळे चेहऱ्यावरील फॅट वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.