Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: ३ वर्षांच्या दिव्यांग मुलीचं अपरहण, सामूहिक बलात्कार करून तिथंच सोडून दिलं; आई गाढ झोपेत असतानाच..

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये ३ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. आईसोबत झोपलेल्या चिमुकलीचे अपरहण करून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य करण्यात आले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये ३ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची हादरवून टाकणारी घटना घडली. लखनऊच्या आलमबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मेट्रोच्या पुलाखाली ही चिमुकली आपल्या आईसोबत झोपली होती. आरोपीने या मुलीला तोंड दाबून उचलून नेले त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि गंभीर अवस्थेत तिला तिथेच सोडून निघून गेले. चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ वर्षांची दिव्यांग चिमुकली आपल्या आईसोबत मेट्रो पुलाखाली झोपली होती. त्याचवेळी आरोपींनी या चिमुकलीचे अपरहण केले त्यानंतर तिला मेट्रो पुलाखालीच एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी मुलीला गंभीर अवस्थेत तिथेच सोडून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. पण तिची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत चंदानगर मेट्रो स्टेशन परिसरात राहते. रात्री आपल्या आई-वडिलांसोबत ही मुलगी झोपली होती. सकाळी जाग आल्यानंतर तिच्या आई-वडिलांना मुलगी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला. तर चिमुकली बेशुद्धावस्थेत मेट्रो पुलाखाली सापडली. मुलीची अवस्था पाहून तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

आई-वडिलांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेलं आणि याबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

SCROLL FOR NEXT