Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : संतापजनक! ९वीच्या विद्यार्थिनीवर ४ महिने १० जणांनी केला बलात्कार

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर गंभीर अत्याचार प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • गोरखपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

  • चार महिन्यांनंतर मुलगी सापडली

  • १० आरोपींना पोलिसांनी अटक केली

  • प्रकरणामुळे परिसरात संताप

Uttar Pradesh 9th Class Girl Rape By 10 Boys उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ९ वीत शिकणाऱ्या मुलीचं शाळेत जाताना अपहरण करून तिच्यावर आळीपाळीने सलग चार महिने १० तरुणांनी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १० तरुणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी शिक्षणासाठी तिच्या मावशीच्या घरी राहण्यासाठी आली होती. तिचे वडील गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर आई आजारी असल्यामुळे घरीच असते. चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडितेच्या मावशीचं घर आहे. नेहमी प्रमाणे ती १ नोव्हेंबर रोजी शाळेसाठी निघाली आणि घरी परतलीच नाही.

कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आठवडाभर तिचा शोध घेतला आणि ७ नोव्हेंबर रोजी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. अशातच अथक प्रयत्नानंतर आणि शोधानंतर पीडित मुलगी तब्बल ४ महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तिची विचारपूस केली. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, शाळेत जात असताना ओळखीच्या ऑटो चालकाने तिला त्याच्या रिक्षात बसवले आणि एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर नेवून तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर सलग चार महिने वेगवगेळ्या हॉटेलवर नेवून १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर तिला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १० तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Din 2026 Wishes: जय जय महाराष्ट्र माझा! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

12th Result Announcement Date : मोठी बातमी! बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार?

स्टार चिन्ह असलेली नोट नकली? 100, 500 च्या नकली नोटा चलनात?

पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार? कच्च्या तेलाच्या किमती 125 डॉलरच्या वर

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

SCROLL FOR NEXT