Aunty ran away with nephew Saam Tv News
क्राईम

Crime News : मामीचा भाच्यावर जीव जडला, अनैतिक संबंधू ठेवून मामाला सोडून खुशनुमा मामी भाच्यासोबत फरार; आपल्यासोबत...

Crime News : महिला खुशनुमा १० जून रोजी सकाळी डॉक्टरांकडून औषध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. पती गुलबहारने अनेकदा फोनद्वारे संपर्क केला तरी, तिचा मोबाईल बंदच लागत होता.

Prashant Patil

बिदायू : उत्तर प्रदेशातील बिदायू जिल्ह्यात एका अफजल नावाचा तरुणाचं आपल्याच मामीसोबत चक्कर चालू लागला. त्याच्या मामीचं नाव खुशनुमा असून तो आपल्या खुशनुमाला घेऊन फरार झाला आहे. या घटनेची माहिती अफजलचा मामा गुलबहारला समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. गुलबहार हा सध्या दिल्लीत मजूरीचं काम करतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करतो. या प्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.

औषध आणते असं सांगून गेली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, महिला खुशनुमा १० जून रोजी सकाळी डॉक्टरांकडून औषध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. पती गुलबहारने अनेकदा फोनद्वारे संपर्क केला तरी, तिचा मोबाईल बंदच लागत होता.

पती गुलबहारला आपल्या पत्नीवर संशय आल्यानं तो त्याच्या गावी आला. तपास केला असता, आपली पत्नी खुशनुमा ही आपल्याच भाच्यासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली. गुलबहार आणि खुशनुमाच्या विवाहाला काही काळ लोटून गेला होता. गुलबहार पोटापाण्याच्या प्रश्नासाठी दिल्ली येथेच राहत होता. यामुळे पत्नी खुशनुमा ही एकटी पडू लागली. अशावेळी तिने अफजलला जवळ केलं आणि त्याच्यासोबत तिने अनैतिक संबंध जोडले.

याचा त्रास हा गुलबहरला झाला. स्थानिक नागरिकरांनी सांगितलं की, मामा घरी नसायचा तेव्हा अफजल मामी खुशनुमाला भेटण्यासाठी यायचा. याचदरम्यान, दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. संबंधित प्रकरणात आरोप आहे की, पत्नी खुशनुमा पळून जाताना सोबत ३० हजार रक्कम आणि सोने-चांदी घेऊन फरार झाली.

दरम्यान, पीडित गुलबहारने पोलीस ठाण्यात अफजलविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पत्नीचा शोध घ्यावा आणि न्याय मिळावा अशी विनंती केली. हे कौटुंबिक प्रकरण असल्यानं पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही, परंतु पोलीस आता खुशनुमा आणि अफजलचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग; अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

Ghatkopar Rain : मुंबईच्या उपनगरात पावसाची तुफान हजेरी, घाटकोपर-नाहूर परिसर जलमय | VIDEO

Monsoon Session 2025: ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारताची ताकद पाहिली, पावसाळी अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

Heart attack risk: फक्त 108 रुपये अन् 2 मिनिटांत हार्ट अटॅकचा धोका कळणार; पाहा नेमकं कसं?

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

SCROLL FOR NEXT